Redmi Note 11T 5G: भारतात आला रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone; फोनमध्ये 11GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: November 30, 2021 03:09 PM2021-11-30T15:09:17+5:302021-11-30T15:09:56+5:30
Redmi Note 11T 5G Price In India: Redmi Note 11T 5G भारतात 11GB RAM, 5000mAh Battery आणि 33W फास्ट चार्जिंग अशा फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.
Xiaomi नं अखेरीस आपला सर्वात स्वस्त 5G Phone सादर केला आहे. अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर Redmi Note 11T 5G Phone भारतात लाँच झाला आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 चा रीब्रँड व्हर्जन असल्याचं दिसतंय. ज्यात 11GB RAM, 5000mAh Battery आणि 33W फास्ट चार्जिंग असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.
Redmi Note 11T 5G ची किंमत
Redmi Note 11T चे तीन व्हेरिएंट आले आहेत. फोनचा 6GB RAM आणि 64GB Storage व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंटसाठी 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Stardust White, Aquamarine Blue आणि Matte Black कलरमध्ये 7 डिसेंबरपासून अॅमेझॉनवर विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी 1,000 रुपयांचा डिस्काउंट देता येईल.
Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू दिला आहे.
त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. डिवाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम फिचर दिला आहे. या फिचरच्या मदतीने अतिरिक्त 3GB रॅम वाढवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.
रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.