बजेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग! Redmi करणार कमाल, याच महिन्यात येणार दमदार स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: May 6, 2022 09:01 AM2022-05-06T09:01:01+5:302022-05-06T09:01:32+5:30

Xiaomi Redmi Note 11T Pro लाँच होणार असल्याची माहिती खुद्द कंपनीनं दिली आहे. हा डिवाइस बजेटमध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स देऊ शकतो.  

Xiaomi Redmi Note 11t Pro May Come With AMOLED Display Official Launch Confirmed   | बजेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग! Redmi करणार कमाल, याच महिन्यात येणार दमदार स्मार्टफोन 

बजेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग! Redmi करणार कमाल, याच महिन्यात येणार दमदार स्मार्टफोन 

Next

Xiaomi च्या एका अधिकाऱ्यानं काही दिवसांपूर्वी एक रेडमी नोट सीरिजचा स्मार्टफोन टीज केला होता. आता या डिवाइसचं संपूर्ण नाव कंपनीनं कन्फर्म केलं आहे. लवकरच बाजारात Redmi Note 11T Pro स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. या डिवाइसचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.  

Redmi Note 11T Pro लाँच डेट 

कंपनीनं Redmi Note 11T Pro च्या लाँच डेटची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु हा फोन या महिन्यात चीनमध्ये पदार्पण करेल, हे सांगण्यात आलं आहे. भारतीय लाँचची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही. चिनी लाँचनंतर भारतीय लाँचसाठी जास्त दिवस वाट बघावी लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. Redmi Note 11T Pro च्या टीजर पोस्टरमधून डिवाइसची कोणतीही माहिती मिळाली नाही.  

संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11T Pro स्मार्टफोनमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या Redmi Note 11T पेक्षा जास्त दमदार स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. यात 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या हँडसेटमध्ये 67W किंवा 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.  

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पावर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू दिला आहे.  

त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. डिवाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम फिचर दिला आहे. या फिचरच्या मदतीने अतिरिक्त 3GB रॅम वाढवता येतो, त्यामुळे एकूण रॅम 11GB होतो. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.  

रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. 

Web Title: Xiaomi Redmi Note 11t Pro May Come With AMOLED Display Official Launch Confirmed  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.