Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका 'चुकूनही' करू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 12:06 PM2020-02-06T12:06:47+5:302020-02-06T12:07:36+5:30
शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत.
शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. फोनच्या विक्रीच्या आकड्यांच्या मानाने हे खूपच नगन्य असले तरीही तुमच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. नुकतीच रेडमीच्या लोकप्रिय झालेल्या Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
हा फोन लोकल रिपेअरिंग दुकानात दुरुस्त करण्यात आला होता. ही घटना गुजरातची आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा फोन दुरुस्त करत असताना त्याच्या बॅक पॅनलमधून धूर येऊ लागला आणि काही वेळातच जळून खाक झाला.
ही घटना कळताच शाओमीने खुलासा केला आहे. आगीची घटना समजल्यानंतर आम्ही ग्राहकाकडे पोहोचलो. रिपेरिंग शॉपमध्ये आणण्याआधीच फोन तुटलेला होता. लोकल दुकानदाराने या फोनला दुरूस्त करण्याऐवजी आणखी नुकसान पोहोचवले होते. याबाबत ग्राहकाशी चर्चा करण्यात आली असून हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. ग्राहकांनी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच दुरुस्ती करावी.
फोन कसा वापरावा? काय काळजी घ्यावी....
स्मार्टफोनमध्ये लिथिअम आयनची बॅटरी असते. ही बॅटरी पटकन पेट घेते. यामुळे काही काळजी घ्यावी लागते. फोन रात्रभर चार्ज करायला ठेवू नये. चार्जर त्या फोनचाच वापरावा. गादीखाली, उशीखाली फोन ठेवू नये. फोनवर दाब पडेल अशा ठिकाणी ठेवू नये. थेट उन्हापासूनही फोनचे तापमान वाढते. यामुळे फोन फुटण्याची शक्यता असते. स्थानिक दुकानात मिळणारी स्वस्त बॅटरी किंवा चार्जर वापरू नये. तसेच फोन सतत वापरू नये. इंटरनेटही काही वेळासाठी बंद ठेवावे.