‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात
By सिद्धेश जाधव | Published: April 23, 2022 12:57 PM2022-04-23T12:57:00+5:302022-04-23T12:57:15+5:30
Xiaomi आणि Samsung ला Realme ची चांगलीच टक्कर देत आहे. सध्या जरी हे ब्रँड्स टॉपला असले तरी रियलमीचा वेग पाहता किती काळ हे दृश्य असेल सांगता येत नाही.
मार्केट रिसर्च फर्म Canalys नं भारतात पहिल्या तिमाहीत झालेल्या स्मार्टफोन शिपमेंटचा रिपोर्ट सादर केला आहे. त्यानुसार मार्केट शेयर कमी होऊन देखील Xiaomi पहिल्या स्थानावर आहे. यंदा Realme नं जबरदस्त वाढ केली आहे, कंपनीच्या मार्केट शेयरमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 4 टक्के वाढ झाली आहे. Samsung, Vivo आणि OPPO भारतातील टॉप-5 ब्रँड्समध्ये आहेत.
रिपोर्टनुसार , भारतात स्मार्टफोन शिपमेंट फक्त 2 टक्के ही बढ़ा आहे. जानेवारी पासून मार्च के बीच सप्लाई चेन मध्ये कॉन्स्ट्रेंट की वजह से शिपमेंट मध्ये जास्त ग्रोथ देखने को नहीं मिला आहे. 2022 की पहली तिमाहीत वेंडर्स ने भारतात एकूण 38 मिलियन म्हणजे 3.8 कोटी स्मार्टफोन शिप केले आहेत, जो गेल्यावर्षी के मुकाबले फक्त 2 टक्के जास्त आहे.
शिप केलेले स्मार्टफोन
यंदा पहिल्या तिमाहीत Xiaomi नं भारतात सर्वाधिक 80 लाख स्मार्टफोन शिप केले आहेत. 69 लाख स्मार्टफोन शिप करणारी Samsung दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रियलमीनं गेल्यावर्षीच्या तुलनेत 40% जास्त स्मार्टफोन शिप केले आहेत, त्यामुळे 60 लाख स्मार्टफोन शिप कौन रियलमीनं तिसऱ्या क्रमाकांवर झेप घेतली आहे. BBK चे अन्य दोन ब्रँड्स Vivo आणि OPPO देखील 57 लाख आणि 46 लाख यूनिट्ससह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
मार्केट शेयर
भारतात Xiaomi चा मार्केट शेयर 21 टक्के आहे, जो गेल्यावर्षीच्या 28 टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. Samsung चा मार्केट शेयर एक टक्क्यानं कमी होऊन 18 टक्के झाला आहे. Realme चा मार्केट शेयर 12 टक्क्यांवरून 16 टक्के झाला आहे. रियलमीनं Vivo ची जागा घेतली आहे, यंदा विवोचा मार्केट शेयर 3 टक्के कमी होऊन 15 टक्के झाला आहे. तर 12 टक्के मार्केटशेयरसह OPPO पाचव्या क्रमाकांवर आहे.
अन्य ब्रँड्समध्ये Tecno देखील भारतीय बाजारात चांगली वाढ करत आहे. या पाच प्रमुख ब्रँड्स व्यतिरिक्त 18 टक्के मार्केट शेयर छोट्या ब्रँड्सकडे आहे. ज्यात नोकिया, मोटोरोला, इनफिनिक्स, मायक्रोमॅक्स, लावा इत्यादींचा समावेश आहे. Redmi आणि POCO चे स्मार्टफोन्स शाओमीच्या आकड्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तर OPPO च्या शिपमेंटमध्ये OnePlus चे फोन्स देखील आहेत.