Xiaomi ने भारतात लाँन्च केला स्वस्त Smart TV 5A, फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:20 PM2022-04-27T16:20:27+5:302022-04-27T16:20:56+5:30

Xiaomi ने आपल्या नव्या Smart TV ला देखील बाजारात आणलं आहे. कंपनीनं Xiaomi OLED Vision टीव्ही देखील लाँन्च केला आहे. 

xiaomi smart tv 5a series with dolby audio android tv 11 launched in india | Xiaomi ने भारतात लाँन्च केला स्वस्त Smart TV 5A, फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या...

Xiaomi ने भारतात लाँन्च केला स्वस्त Smart TV 5A, फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या...

Next

Xiaomi ने आज आपल्या कंपनीचे अनेक डिव्हाइस भारतात लाँन्च केले आहेत. कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro 5G आणि Xiaomi Pad 5 Android टॅबलेट दाखल केला आहे. यासोबतच Xiaomi ने आपल्या नव्या Smart TV ला देखील बाजारात आणलं आहे. कंपनीनं Xiaomi OLED Vision टीव्ही देखील लाँन्च केला आहे. 

कंपनीनं या इव्हेंटमध्ये Xiaomi Smart TV 5A Series देखील आणली आहे. या टेलिव्हीजन सीरीजला तीन स्क्रीन साइजमध्ये आणलं आहे. यात ३२ इंचांपासून ४३ इंचांच्या साइजमध्ये स्मार्टटिव्ही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तिन्ही स्मार्टटिव्ही Android TV 11 OS आऊट-ऑफ-द-बॉक्स प्रणालीवर काम करतात. 

Xiaomi Smart TV 5A Series ची किंमत आणि उपलब्धता
Xiaomi Smart TV 5A यातील ३२ इंचाच्या टेलिव्हिजनची किंमत १५,४९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर याच्या ४० इंचाच्या मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये इतकी आहे. तर ४३ इंचाचा टीव्ही २५,९९९ रुपयांना मिळेल. तिन्ही टीव्हीचा सेल ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे. 

ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart शिवाय Mi.com आणि Mi स्टोअरमध्ये टेलिव्हिजन खरेदी करता येणार आहे. तसंच तुम्ही जर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी करणार असाल तर अतिरिक्त २ हजार रुपयांचा डिस्काऊंट देखील मिळवता येणार आहे. 

Xiaomi Smart TV 5A Series चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
Xiaomi Smart TV 5A Series मधील ३२ इंचाच्या टेलिव्हिजनमध्ये HD रेज्युलेशनसह उपलब्ध आहे. तर ४० इंच आणि ४३ इंचाचा टेलिव्हिजन Smart TVs Full HD रेज्युलेशनसह उपलब्ध आहे. तिन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये Xiaomi च्या Vivid Picture Engine इमेज प्रोसेसिंग टेकचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम कलर आणि कॉन्ट्रास्टचा अनुभव घेता येईल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

ऑडिओसाठी ४० इंच आणि ४३ इंचाच्या टेलिव्हिजनमध्ये 24W स्पीकर सेटअप देण्यात आला आहे. तर ३२ इंचाच्या मॉडलमध्ये 20W चा स्पीकर देण्यात आला आहे. सर्व स्मार्ट टीव्हीमध्ये Dolby Audio, DTS-X आणि DTS-X Virtual सपोर्ट सिस्टम आहे. 

Android TV 11 out of the box बेस्ड Xiaomi चा Patchwall UI देण्यात आला आहे. यात IPL 2022 विजेट देखील देण्यात आळं आहे. यात यूजर्सला गुगल असिस्टंट, क्रोमकास्ट, गुगल प्ले स्टोअर आणि प्ले सर्व्हीसचा देखील सपोर्ट देण्यात आला आहे. 

४० आणि ४३ इंचाच्या टेलिव्हिजनमध्ये १.५ जीबी रॅम व 8GB स्टोरेज देण्यात आला आहे. हे टीव्ही क्वाडकोअर A55 CPU सह येतात. ३२ इंचाच्या मॉडलमध्ये 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज देण्यात आला आहे. यात Bluetooth 5.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच ड्युअल बँड WiFi सपोर्ट, इंटरनेट पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅकसपोर्ट देखील आहे. 

कंपनीनं आपल्या प्रिमियम Xiaomi OLED Vision टेलिव्हिजन देखील बाजारात दाखल केला आहे. या टेलिव्हिजनची किंमत भारतात ८९,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. बँक ऑफर्ससह हा टीव्ही तुम्हाला ८३,९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. 

Web Title: xiaomi smart tv 5a series with dolby audio android tv 11 launched in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.