शाओमीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; Mi TV आणि Redmi TV चे अनेक मॉडेल्स महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:41 PM2021-07-01T18:41:24+5:302021-07-01T18:43:51+5:30
Xiaomi ने आपल्या स्मार्ट टीव्हीच्या अनेक मॉडेल्स च्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने या टीव्ही मॉडेल्सच्या किंमतीत 500 ते 2000 रुपयांची वाढ केली आहे.
Xiaomi ने काही दिवसांपूर्वी Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro सह इतर काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केल्याच्या बातम्या आल्या होता. आता कंपनीने आपल्या स्मार्ट टीव्हीच्या किंमती वाढवल्या आहेत. शाओमीने Mi TV आणि Redmi TV च्या किंमतीती 500 ते 2000 रुपयांची वाढ केली आहे. कंपोनंटसची तुटवडा आणि सप्लाय चेनमध्ये आलेल्या अडचणींमुळे कंपनीने किंमती वाढवल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
शाओमी स्मार्ट टीव्हीच्या किंमतीत केलेली वाढ
Xiaomi ने एकूण 10 स्मार्ट टीव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे, अशी माहिती 91मोबाईल्सने दिली आहे. Mi TV 4A 32-इंच मॉडेलची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे, त्यामुळे ही टीव्ही 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Mi TV 4A 43-इंच, Mi TV 4A Horizon Edition 40-इंच, Mi TV 4X 43-इंच आणि Redmi TV 65-इंच या टीव्हीच्या किंमतीत 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच Mi TV 4A Horizon Edition 43-इंच, Mi TV 4X 55-इंच, Redmi TV 50-इंच, Redmi TV 55-इंच आणि Mi TV QLED 55-इंच टीव्ही मॉडेल्स 2000 रुपयांनी महागले आहेत.
स्मार्ट टीव्ही मॉडेल्सच्या किंमती वाढवण्यामागचे कारण शाओमीने अधिकृतपणे सांगितले नाही. परंतु कंपनीने ऑनलाइन साइट्सवर नवीन किंमतीसह हे प्रॉडक्ट्स लिस्ट केले आहेत. शाओमीने या टीव्हीच्या किंमतीत वाढ करण्यामागचे कारण कंपोनंट्सचा तुटवडा आणि सप्लाय चेनमध्ये येणाऱ्या अडचणी असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.