Xiaomi ने पुन्हा दिला चाहत्यांना दणका! Redmi 9A आणि Redmi 9A Sport स्मार्टफोन महागले
By सिद्धेश जाधव | Published: November 11, 2021 03:46 PM2021-11-11T15:46:31+5:302021-11-11T15:47:31+5:30
Xiaomi Redmi Phone Price Hike: कंपनीने Redmi 9A आणि Redmi 9A Sport च्या किंमती वाढवल्यात आहेत. यावर्षी याआधी देखील कंपनीने रेडमी फोन्समध्ये भाववाढ केली होती.
गेल्या शाओमीने Redmi 9A Sport स्मार्टफोन सादर केला होता. आता लाँचनंतर फक्त एका महिन्यात कंपनीने या फोनची किंमत वाढवली आहे. त्याचबरोबर अजून एक Redmi Phone महाग केला आहे. कंपनीने Redmi 9A आणि Redmi 9A Sport च्या किंमती वाढवल्यात आहेत. यावर्षी याआधी देखील कंपनीने रेडमी फोन्समध्ये भाववाढ केली होती.
Xiaomi ने Redmi 9A आणि Redmi 9A Sport स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत वाढवली आहे. या दरवाढीमुळे आता ग्राहकांना दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर 300 रुपये जास्त द्यावे लागतील. त्यामुळे आता हे हे फोन्स 7000 रुपयांच्या आत राहिले नाहीत.
Xiaomi Redmi 9A आणि Redmi 9A Sport ची नवीन किंमत
Redmi Phone | जुनी किंमत | नवीन किंमत |
---|---|---|
Xiaomi Redmi 9A 2GB/32GB | 6,999 ₹ | 7,299 ₹ |
Xiaomi Redmi 9A 3GB/32GB | 7,999 ₹ | 8,299 ₹ |
Xiaomi Redmi 9A Sport 2GB/32GB | 6,999 ₹ | 7,299 ₹ |
Xiaomi Redmi 9A Sport 3GB/32GB | 7,999 ₹ | 8,299 ₹ |
Redmi 9A आणि Redmi 9 A Sport चे स्पेसिफिकेशन्स
शाओमीचे हे दोन्ही स्मार्टफोन 6.53 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आले आहेत. हे फोन्स वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. हे फोन्स अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो जी25 चिपसेट देण्यात आला आहे.
दोन्ही फोनमध्ये बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे फोन बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटी फिचरमध्ये फेस अनलॉकचा समावेश करण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Redmi 9A Sport आणि Redmi 9A मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.