कमी किंमतीत धमाकेदार फीचर्ससह Redmi Note 11 series होऊ शकते लाँच; Xiaomi ने शेयर केला टीजर  

By सिद्धेश जाधव | Published: October 13, 2021 12:27 PM2021-10-13T12:27:15+5:302021-10-13T12:27:43+5:30

Xiaomi Redmi Note 11 Series Launch: Redmi Note 11 series आता रेडमीच्या अधिकाऱ्यांनी टीज केल्यामुळे रेडमी नोट 11 लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार हे निश्चित झाले आहे.

Xiaomi teased the launch of redmi note 11 series  | कमी किंमतीत धमाकेदार फीचर्ससह Redmi Note 11 series होऊ शकते लाँच; Xiaomi ने शेयर केला टीजर  

कमी किंमतीत धमाकेदार फीचर्ससह Redmi Note 11 series होऊ शकते लाँच; Xiaomi ने शेयर केला टीजर  

googlenewsNext

शाओमीची लोकप्रिय रेडमी नोट सीरिज लवकरच पुनरागमन करण्याच्या मार्गावर आहे. Xiaomi चे व्हाईस प्रेजिटेंड आणि Redmi चे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी आगामी सीरीजचा लाँच टीज केला आहे. त्यांनी चिनी सोशल मीडिया साईट Weibo वरून Redmi Note 11 series चा लाँच टीज केला आहे. त्यामुळे शाओमीच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  

गेले कित्येक दिवस Redmi Note 11 series ची माहिती लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर येत आहे. आता रेडमीच्या अधिकाऱ्यांनी ही सीरिज टीज केल्यामुळे रेडमी नोट 11 लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार हे निश्चित झाले आहे. रेडमीची नोट सीरिज कमी किंमतीत चांगले फीचर्स देण्यासाठी ओळखली जाते.  

Redmi Note 11 series चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने रेडमी नोट 11 सीरिजचे स्पेक्स लीक केले आहेत. हे स्पेसिफिकेशन्स चिनी सोशल मीडिया साईट विबोवर शेयर करण्यात आले आहेत. त्यानुसार Redmi Note 11 series मधील टॉप अँड मॉडेल 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. म्हणजे Note 11 Pro आणि 11 Pro Max स्मार्टफोनमध्ये ही फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.   

याआधीच्या Redmi Note 10 series मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आला होता. त्यामुळे आगामी सीरिज देखील याच स्पेक्ससह बाजारात दाखल होऊ शकते. तसेच स्मार्टफोन बाजारातील सध्या स्थिती पाहता Redmi Note 11 series मधील स्मार्टफोन्स 5G कनेक्टिविटीसह सादर केले जाऊ शकतात.  

Web Title: Xiaomi teased the launch of redmi note 11 series 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.