पैसे न देता बोला अमर्याद; 5000km रेंज असलेला शाओमीचा वॉकी-टॉकी लाँच, फक्त इतकी आहे किंमत
By सिद्धेश जाधव | Published: April 8, 2022 03:53 PM2022-04-08T15:53:42+5:302022-04-08T15:53:52+5:30
शाओमीचा नवीन Walkie-Talkie 3 5000km च्या रेंजमध्ये संपर्क साधू शकतो. हा वॉकी-टॉकी 60 तासांचा बॅटरी बॅकअप देतो.
Xiaomi फक्त स्मार्टफोन्स सादर करत नाही. कंपनी विविध टेक डिवाइस सादर करत असते. अशाच एका वॉकी-टॉकी लाईनअपमध्ये Walkie-Talkie 3 मॉडेल जोडण्यात आला आहे 5,000 किलोमीटरची रेंज असलेला हा वॉकी-टॉकी चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात 30% जास्त मोठा आवाज मिळेल, असा दावा शाओमीनं केला आहे. Xiaomi Walkie-Talkie 3 ची चीनमध्ये किंमत 399 युआन (जवळपास 4,700 रुपये) ठेवण्यात आली आहे.
Xiaomi Walkie-Talkie 3 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Walkie-Talkie 3 मध्ये 2-इंचाचा कलर डिस्प्ले मिळतो. धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP54 ची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, यात 3.5mm हेडसेट पोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. Xiaomi Walkie-Talkie 3 मध्ये 3000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 100 तासांचा स्टॅन्ड बाय टाइम आणि 60 तासांचा टॉक टाइम देते. चार्जिंगसाठी Type-C पोर्ट मिळतो.
कंपनीचा हा पहिला वॉकी-टॉकी आहे 4G Full Netcom सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. चीनमधील मोठे ऑपरेटर्स या नेटवर्कला सपोर्ट करतात. या एकमेव फिचरमुळे या वॉकी-टॉकीची रेंज इतकी वाढली आहे. चीनमध्ये 5000 किलोमीटरच्या रेंजमध्ये सहज या वॉकी-टॉकीच्या मदतीनं संपर्क साधता येईल.
शाओमीनं यात ओव्हर द एयर (OTA) अपडेटचा पर्याय दिला आहे. त्यामुळे यात वेळोवेळी नवीन फिचर अपडेट देण्यात येतील. यात 40mm चे स्पिकर्स देण्यात आले आहेत. आजूबाजूचा आवाज कमी करण्यासाठी नॉइज कॅन्सलिंग फिचर देण्यात आलं आहे. यात इंडिपेन्डेंट ग्रुप बिल्डिंग, क्विक टीम फॉर्मेशन आणि प्रायव्हेट इंटरकॉम सारखे फीचर्स देखील मिळतात.