स्ट्रेस मॉनिटरिंग फिचरसह Xiaomi Watch Color 2 लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
By सिद्धेश जाधव | Published: September 29, 2021 11:47 AM2021-09-29T11:47:40+5:302021-09-29T11:48:07+5:30
Latest Smartwatch Xiaomi Watch Color 2 Price: शाओमीने Watch Color 2 ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल (SpO2) ट्रॅकिंग, हार्ट रेट मेजरमेंट, स्ट्रेस मॉनिटरिंग, स्लिप ट्रॅकिंग सारख्या फीचर्ससह सादर केला आहे.
शाओमीने आपल्या स्मार्ट अॅक्सेसरीज पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीने आपल्या नव्या CIVI स्मार्टफोनसह Xiaomi Watch Color 2 देखील चीनमध्ये सादर केला आहे. 12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल (SpO2) ट्रॅकिंग, हार्ट रेट मेजरमेंट, स्ट्रेस मॉनिटरिंग, स्लिप ट्रॅकिंग अशा फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.
Xiaomi Watch Color 2 ची किंमत
Xiaomi Watch Color 2 स्मार्टवॉच चीनमध्ये सादर केला आहे. तिथे या वॉचची किंमत 999 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत जवळपास 11,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा वॉच ब्लॅक, ब्लू, ग्रीन, रेड, व्हाइट आणि येलो या स्ट्रॅप कलर्ससह विकत घेता येईल. तसेच यात तीन डायल कलर देखील मिळतील.
Xiaomi Watch Color 2 चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी वॉच कलर 2 मध्ये 1.43-इंचाचा कलर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील 470mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. हा स्मार्टवॉच मॅग्नेटिक चार्जरने चार्ज करता येतो. शाओमी वॉच कलर 2 5ATM वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.
या वॉचमध्ये एकूण 136 स्पोर्ट्स मोड आहेत ज्यात 19 प्रोफेशनल स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. हेल्थ मॉनिटरिंगसाठी शाओमी वॉच कलर 2 मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्लिप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, ब्रिदिंग गाईड, मेनस्ट्रल ट्रॅकिंग आदि असे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचा नेव्हिगेशन, कॅलक्युल्टर, वेदर रिमाइंडर इत्यादी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.