Xiaomi आता कर्ज देणार; काही मिनिटांत मिळणार 1 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 07:37 PM2019-12-03T19:37:31+5:302019-12-03T19:38:06+5:30

ऑनलाईन क्रेडिट लेंडिंगमध्ये भारतात संधी आहे. 2023 पर्यंत 70 लाख कोटींचा आकडा पार होण्याची शक्यता आहे.

Xiaomi will now give personal loan; 1 lakh will be received in a few minutes | Xiaomi आता कर्ज देणार; काही मिनिटांत मिळणार 1 लाख रुपये

Xiaomi आता कर्ज देणार; काही मिनिटांत मिळणार 1 लाख रुपये

Next

मुंबई : गेल्या पाच वर्षांत चीनची कंपनी शाओमीने भारताची स्मार्टफोन बाजारपेठ काबीज केली आहे. सॅमसंग सारख्या मोठ्या कंपनीला मागे टाकत शाओमीने नवनवीन उत्पादनेही लाँच केली आहेत. आता शाओमी भारतीयांना तात्काळ कर्जही देऊ करणार आहे. 


शाओमीने आज पर्सनल लोन सर्विस एमआई क्रेडिट (Mi Credit) लाँच केले आहे. एमआय पे नंतर कंपीनीने आणलेली ही दुसरी पेमेंट सर्व्हिस आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार शाओमीचे उपाध्यक्ष मनु जैन यांनी सांगितले की, एमआय क्रेडिट बेस्ड पर्सनल लोन हे एक ऑनलाईन सेवा देणारे आहे. येथून लोक एक लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. याच्या प्रोसेसिंगसाठीही कमी शुल्क आकारले जाणार आहे तसेच वेळही कमी लागणार आहे. 


ऑनलाईन क्रेडिट लेंडिंगमध्ये भारतात संधी आहे. 2023 पर्यंत 70 लाख कोटींचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. कंपनी डिजिटली मजबूत असल्याने एमआय क्रेडिट सर्व्हिस ग्राहकांना कमीतकमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध होणार आहे, असे जैन म्हणाले. 

एमआय क्रेडिटने आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड, मनी व्यू, अर्ली सॅलरी, जस्ट मनी, क्रेडिटविधा आणि एनबीएफसी, फिनटेक सारख्या कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे. या कंपन्यांद्वारे एमआय ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज देणार आहेत. 

Web Title: Xiaomi will now give personal loan; 1 lakh will be received in a few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :xiaomiशाओमी