Xiaomi करतेय स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी; Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जसह येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: November 16, 2021 07:39 PM2021-11-16T19:39:59+5:302021-11-16T19:40:24+5:30

Budget Flagship From Xiaomi: शाओमी लवकरच परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करू शकते. हा स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो.  

Xiaomi will soon launch phone with snapdragon 870 and 67w fast charging  | Xiaomi करतेय स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी; Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जसह येणार बाजारात 

Xiaomi करतेय स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी; Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जसह येणार बाजारात 

googlenewsNext

Xiaomi आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. कंपनी सतत असे स्मार्टफोन सादर करत असते. सध्या कंपनी अजून एका बजेट फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी करत आहे. लवकरच शाओमीचे दोन स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करू शकते. यातील एक स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो.  

शाओमीचे मॉडेल नंबर 2201123C आणि 2112123AC असलेले दोन फोन सर्टिफिकेशन साईटवर दिसले आहेत. यातील 2112123AC मोडले नंबर असलेला स्मार्टफोन TENAA वर दिसला आहे. या लिस्टिंगनुसार हा फोन Snapdragon 870 SoC आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात येईल. काही दिवसांपूर्वी Xiaomi 12, 12 Pro आणि 12 Ultra स्मार्टफोनची L2, L1A, आणि L1 अशी नावे समोर आली होती. तर Redmi K50 सीरीजचे स्मार्टफोन L10, L10A, L11, आणि L11R नावाने लाँच केले जाऊ शकतात.  

या फोन मॉडेलमधील 2112123AC स्मार्टफोन L3A व्हेरिएंट बाजारात Xiaomi 12 लाइनअप का Xiaomi 12 Mini नावाने उतरवला जाऊ शकतो. हा एक बजेट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. ज्यात Qualcomm Snapdragon 870 चिपसेट देण्यात येईल. टिपस्टर मुकुल शर्माने देखील जागतिक बाजारात येणाऱ्या आणि Snapdragon 870, 67W चार्जिंग आणि चांगला कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे. हा फोन भारतात देखील येऊ शकतो. सर्टिफिकेशन आणि टिपस्टरने सांगितले दोन्ही फोन एक असतील कि नाही हे सांगता येत नाही.  

Web Title: Xiaomi will soon launch phone with snapdragon 870 and 67w fast charging 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.