काय सांगता! फक्त आवाजाने चार्ज होईल स्मार्टफोन; ‘या’ कंपनीने केली कमाल
By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2021 03:10 PM2021-06-21T15:10:29+5:302021-06-21T15:22:17+5:30
Xiaomi Sound Charge: शाओमीने CNIPA कडे एका साऊंड चार्जरसाठी एक पेटंट फाईल केले आहे, जो आवाजाच्या माध्यमातून स्मार्टफोन चार्ज करेल.
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने पुन्हा एक नवीन कारनामा केला आहे. कंपनीने अश्या टेक्नॉलॉजीची निर्मिती केली आहे जी स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्स फक्त आवाजाने चार्ज करेल. यापूर्वी कंपनीने फक्त हवेतून स्मार्टफोन्स चार्ज करणारी ‘Mi Air Charge टेक्नॉलॉजी जगाला दाखवली होती. (After Hypercharge and Aircharge Xiaomi develops tech to charge phone with sound)
कंपनीने या टेक्नॉलजीसाठी China National Intellectual Property Administration (CNIPA) कडे पेटंट फाईल केले आहे. या पेटंटनुसार, ही एक अशी सिस्टम असेल जी ऊर्जा साठवून ठेवण्याच्या मेकॅनिज्मचा वापर करून स्मार्टफोन आवाजाच्या माध्यमातून चार्ज करू शकते. हि टेक्नॉलॉजी आवाजातील कंपने alternative current मध्ये रूपांतरित करते, त्यानंतर ती DC power मध्ये रूपांतरित होऊन स्मार्टफोन चार्ज होतो.
जगावेगळी चार्जिंग टेक्नॉलॉजी आणण्याची ही काही शाओमीची पहिली वेळ नाही. यापूर्वी कंपनीने ‘Mi Air Charge’ चे प्रात्यक्षिक जगाला दाखवले होते. या टेक्नोलॉजीद्वारे थेट स्मार्टफोनला मिलीमीटर वेव्स पोहोचतील आणि या वेव्स इलेक्ट्रिक पावरमध्ये रूपांतरित होऊन फोन चार्ज करतील. चार्जिंग टावरमध्ये पाच फेज-डिटेक्शन अँटेना देण्यात आलेत आहेत, जे कोणत्याही स्मार्टफोन किंवा डिवाइसचे ठिकाण शोधून तो चार्ज करतात. मिलीमीटर वेव्स पाठवण्यासाठी चार्जिंग डिवाइसमध्ये 144 बीमफॉर्मिंग अँटेना आहेत, असे सांगण्यात आले आहे. शाओमीची हि टेक्नॉलॉजी अजून व्यवसायिकरित्या जगासमोर आली नाही.