Xiaomi ची भन्नाट ऑफर; 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 06:27 PM2020-05-04T18:27:46+5:302020-05-04T18:29:49+5:30
कोरोना व्हायरसमुळे चीनची कंपनी शाओमीची विक्री शुन्यावर आली आहे. ही विक्री वाढवण्यासाठी कंपनीने ही ऑफर लागू केली आहे.
नवी दिल्ली : चीनची भारतात काही वर्षांतच प्रसिद्ध झालेली कंपनी शाओमीने एक मोठी ऑफर आणली आहे. यामध्ये Xiaomi ही कंपनी तिच्या ग्राहकांना ३२ इंचाचा टीव्ही मोफत देणार आहे. मात्र, यासाठी कंपनीने एक मोठी अट ठेवली आहे.
जे ग्राहक शाओमीचा हाय एंड Mi ART TV खरेदी करतील त्यांनाच हा टीव्ही मोफत मिळणार आहे. Mi ART TV हा ६५ इंचाचा डिस्प्लेवाला प्रिमिअम स्मार्ट टीव्ही आहे. टीव्हीची विक्री थंडावलेली आहे. यामुळे कंपनीने ही ऑफर आणली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीने ही ऑफर सध्या चीनमध्ये आणली आहे.
चीनमध्ये या टीव्हीची किंमत 6,999 युआन म्हणजेच 75000 रुपये आहे. हा ६५ इंचाचा टीव्ही TV Xiao AI व्हॉईस असिस्टंटसोबत येतो. शिवाय या टीव्हीला स्मार्ट होम प्रॉडक्ट्सही कनेक्ट करता येतात.
शाओमीकडे मोठ्या स्क्रीनचे आणखी दोन टीव्ही आहेत. नुकत्याच झालेल्या एमआय फॅन फेस्टव्हलमध्ये हे लाँच करण्यात आले होते. ७५ इंचाचा फुल स्क्रीन TV Pro आणि Mi TV 4A चा नवीन ६० इंचाचे मॉडेल लाँच केले होते. TV Pro हा शाओमीचा सर्वात मोठा टीव्ही आहे. याशिवाय ४५, ५५ आणि ६५ इंचाचे टीव्ही ही कंपनीने लाँच केले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला
कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...