आयफोनच्या कॅमेऱ्यापेक्षा Xiaomi च्या या फोनचा कॅमेरा 'अप्रतिम'; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 08:07 AM2020-12-06T08:07:21+5:302020-12-06T08:07:47+5:30
Mi 10 Ultra Camera test: शाओमीच्या मालकाने अॅपलच्या मालकाची यशोगाथा पाहून ही कंपनी सुरु केली होती. यानंतर अॅपलसारखेच दिसणारे परंतू अँड्रॉईडवर चालणारे स्मार्ट फोन लाँच केले होते.
चीनची मोठी टेक कंपनी शाओमी १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने Mi 10 Ultra हा स्मार्टफोन घेऊन आली होती. या फोनच्या कॅमेराने जगातील सर्व बड्य़ा कंपन्यांच्या मोबाईलना मागे टाकले आहे. अगदी आयफोनच्या कॅमेरालाही या फोनने धोबीपछाड दिला आहे. ऑगस्टमध्ये DXOMARK कॅमेरा रिव्ह्यू समोर आला होता. यामध्ये सध्याचा चॅम्पिअन असलेला फोन Huawei P40 Pro याला मागे टाकले होते. ऑक्टोबरमध्ये पुन्हा हुवाईच्या फोनने एक नंबर पटकावला असला तरीही शाओमीच्या फोनची कॅमेरा क्वालिटी ही एक नंबर आहे.
Mi 10 Ultra चा प्रायमरी कॅमेरा आयफोनपेक्षादी दमदार असला तरीही त्याचा सेल्फी कॅमेरा टेस्ट निराशाजनक आहे. DXOMARK मध्ये सेल्फी कॅमेरा टेस्टमध्ये या फोनला 88 पॉईंट दिले आहेत. या रिव्ह्यूनुसार फोनचा सेल्फी कॅमेरा ठीकठाक आहे. 88 पॉईंटससह हा कॅमेरा २२ व्या क्रमांकावर आहे. तप प्रायमरी कॅमेरा रँकिंगमध्ये हा फोन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शाओमीच्या या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये सिंगल पंच होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. जो कर्व्हड OLED डिस्प्लेच्या डाव्या बाजुला देण्यास आला आहे. यामध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा 1/3.4 इंच फिक्स्ड-फोकस सेंसर f/2.3 लेंस सोबत देण्यात आला आहे. याद्वारे 20 मेगापिक्सलपर्यंतचे फोटो कॅप्चर केले जाऊ शकतात.
विक्रीतही आयफोनला टाकले मागे
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनन (IDC) ने यंदा तिसऱ्या तिमाहीमध्ये स्मार्टफोन शिपमेंटसंबंधीत रिपोर्ट जारी केला आहे. सॅमसंगने जगभरात डंका गाजवत पहिला क्रमांक कायम राखला आहे. तर शाओमीने (Xiaomi) अॅपलला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावला आहे. महत्वाचे म्हणजे शाओमीच्या मालकाने अॅपलच्या मालकाची यशोगाथा पाहून ही कंपनी सुरु केली होती. यानंतर अॅपलसारखेच दिसणारे परंतू अँड्रॉईडवर चालणारे स्मार्ट फोन लाँच केले होते.
कोरोना संकट असले तरीही स्मार्टफोन पाठविण्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. या तिमाहीत 1.3 टक्के घट झाली आहे. कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये तीन ते चार महिने लॉकडाऊन पडले होते. तरीही हे आकडे खूप चांगले आहेत.
यंदा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या तिमाहीमध्ये 353.6 दशलक्ष स्मार्टफोन पाठविण्यात आले. आयडीसीने कोरोनामुळे 9 टक्क्यांची घट होईल असा अंदाज लावला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त फोन पाठविण्यात आल्याने कोरोनाचा एवढा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.
रिपोर्टनुसार सॅमसंग 22.7 टक्के स्मार्टफोन बाजारावर वर्चस्व ठेवून आहे. कंपनीने 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत 80.4 दशलक्ष युनिट पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने 2.9 टक्के जास्त युनिट बाजारात उपलब्ध केले होते. म्हणजे कोरोनाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 51.9 दशलक्ष युनिट विकत हुवावे ही चिनी कंपनी आहे. तिचे बाजारावर 14.7 टक्के वर्चस्व आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शिपमेंटमध्ये 22 टक्क्यांची घट झाली आहे.
दुसरीकडे तिसऱ्या नंबरवर चीनच्याच आणखी एका कंपनीने मजल मारली आहे. अॅपलसारख्या कंपनीला मागे टाकून शाओमीने 46.5 दशलक्ष युनिट बाजारात विकले आहेत. शाओमीने 13.1 टक्के बाजारावर कब्जा केला आहे. तसेच कमी किंमतीतील फोन आणत 42 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
अॅपल आणि व्हिवोने अनुक्रमे 11.8 टक्के आणि 8.9 टक्के बाजारावर कब्जा केला आहे. महत्वाचे म्हणजे आयफोन 11 हा जगातील सर्वात जास्त खपाचा स्मार्टफोन होता. अॅपलने 41.6 दशलक्ष युनिट आणि व्हिवोने 31.5 दशलक्ष युनिट विकले आहेत.