लवकरच येणार शाओमीचा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: February 23, 2018 01:35 PM2018-02-23T13:35:08+5:302018-02-23T13:35:39+5:30
शाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे.
शाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे.
स्मार्टफोनवर गेम खेळणार्यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे स्मार्टफोनवर गेमिंच्या उत्तम अनुभुतीसाठी विविध फिचर्स देण्याला बहुतांश कंपन्या प्राधान्य देत आहेत. तर अलीकडेच रेझर या कंपनीने खास गेमर्ससाठी स्मार्टफोन लाँच केला आहे. या अनुषंगाने शाओमी कंपनीची मालकी असणार्या ब्लॅक शार्क या उपकंपनीने याच प्रकारातील स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. चीनमधील अनतूतू या बेंचमार्कींग करणार्या संकेतस्थळावर याच्या सर्व फिचर्सची माहिती लिस्टींग करण्यात आली आहे. यानुसार या स्मार्टफोनमध्ये १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच १०८० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर असेल. तर याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल असे या लिस्टींगमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असून यावर शाओमीची मीयुआय हा युजर इंटरफेस असेल.
कोणत्याही गेमिंग स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाचा ग्राफीक प्रोसेसर आणि अंतर्गत कुलींग प्रणाली आवश्यक असते. या अनुषंगाने शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनमध्येही या बाबी निश्चितपणे असतील. तथापि, अनतूतू या साईटवरील लिस्टींगमध्ये याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या बेंचमार्कींग संकेतस्थळावर शाओमीच्या ब्लॅकशार्क या आगामी स्मार्टफोनला सॅमसंगच्या आगामी गॅलेक्सी एस ९ या मॉडेलपेक्षा जास्त स्कोअरींग देण्यात आले आहे. अर्थात यातील सर्व फिचर्स हे दर्जेदार असतील हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये या स्मार्टफोला लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.