Xiaomi चा लवकरच तिहेरी धमाका! Redmi 6 सिरिज करणार लाँच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 16:15 IST2018-08-30T16:14:52+5:302018-08-30T16:15:58+5:30

५ सप्टेंबरला नवी दिल्लीमध्ये लाँच होणार

Xiaomi's Triple Explode Soon! Redmi launches 6 series smartphones ... | Xiaomi चा लवकरच तिहेरी धमाका! Redmi 6 सिरिज करणार लाँच...

Xiaomi चा लवकरच तिहेरी धमाका! Redmi 6 सिरिज करणार लाँच...

नवी दिल्ली : शाओमीने नुकताच सब ब्रँड पोको लाँच केला. यानंतर या कंपनीने रेडमी सिरिजचे एकाचवेळी तीन फोन लाँच करून भारतात सणासुदीवेळी धमाका करणार आहे. शाओमी इंडियाचे भारतील प्रमुख मनू कुमार जैन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.


शाओमी ५ सप्टेंबरला रेडमी 6 (Redmi 6) ही सिरीज लाँच करणार आहे. सध्या बाजारात असलेल्या रेडमी 5 ची ही अपडेट असणार आहे. या तीन फोन पैकी Redmi 6 आणि 6A या दोन फोनना जुनमध्येच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. तसेच रेडमी 6 प्रो वरचाही कंपनीने नुकताच पडदा उठविला आहे.  कंपनीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या इव्हेंटमध्ये मोठ्या आकड्यामध्ये 6 हा आकडा लिहिन्यात आला आहे. तर हा इव्हेंट 5 सप्टेंबरला आयोजित केला आहे.




ट्विटरवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये 6 या नंबरच्या पाठीमागे तीन फोनची चित्रे आहेत. दोन स्मार्टफोनना नॉच नाहीय...तर तिसऱ्या स्मार्टफोनला नॉच दाखवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे रेडमी 6 प्रोमध्ये नॉच डिस्प्ले आहे. कंपनीने पाठिवलेल्या निमंत्रणामध्ये हा कार्यक्रम दिल्लीमध्ये होणार आहे. 
 

Web Title: Xiaomi's Triple Explode Soon! Redmi launches 6 series smartphones ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.