केवळ २९९ रूपयांत खरेदी करू शकता Redmi चे जबरदस्त फोन; पाहा कोणत्या आहेत बेस्ट डील्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 01:22 PM2021-07-14T13:22:37+5:302021-07-14T13:24:48+5:30
Xiaomi : Xiaomi ला भारतीय बाजारपेठेत सात वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं कंपनीनं आपल्या प्रोडक्ट्सवर जबरदस्त डील्स आणल्या आहेत.
Xiaomi नं भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीनं आपल्या जबरदस्त प्रोडक्ट्सना बेस्ट ऑफर आणि डिस्काऊंटमध्ये खरेदी करण्याची संधी दिली आहे. १२ जुलैपासून कंपनीचा हा अॅनिव्हर्सरी सेल सुरू झाला असून तो १६ जुलै पर्यंत चालणार आहे. सेलमध्ये ग्राहकांना अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यावरून Xiaomi चे प्रोडक्ट कमी दरात खरेदी करता येतील. तसंच यामध्ये तुम्ही स्मार्टफोन केवळ २९९ रूपयांत ऑर्डर करू शकता.
याशिवाय स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डावर शॉपिंग केल्यास कंपनी युझरला इन्स्टन्ट डिस्काऊंट देते. जर या सेलदरम्यान, तुम्ही स्टेट बँकेच्या क्रिडिट कार्याजवरून वस्तू खरेदी केल्यास त्यात १० टक्क्यांची सूट मिळते. तसंच एसबीआय कार्डाच्या माध्यमातून Mi 10i किंवा Mi 11 Lite खरेदी केल्यास तुम्हाला १५०० रूपयांचा डिस्काऊंट मिळेल.
याशिवाय कंपनी Mi 11X वर २ हजार रूपये आणि 11X Pro वर ३ हजार रूपयांची सूट देण्यात येत आहे. तर Mi 10T किंवा Mi 10T Pro एसबीआय कार्डवरून खरेदी केल्यास २५०० रूपयांची सूट देण्यात येणार आहे. Mi 11 Ultra खरेदी करणाऱ्यांना ५ हजार रूपयांचा इन्स्टन्ट डिस्काऊंट देण्यात येत आहे. Mi 11 Ultra वर ही ऑफर १५ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत असेल.
पीक अँड चूज बंडल्स ऑफर
या ऑफर अंतर्गत सेलच्या कालावधीत रात्री ८ वाजल्यापासून mi.com कोणतेही दोन प्रोडक्ट डिस्काऊंटसोबत खरेदी करू शकता. डिस्काऊंटची अमाऊंट निरनिराळ्या बंडल प्रोडक्ट्सनुसार बदलू शकते. कंपनी अनेक प्रोडक्ट्सवर फिक्स्ड बंडल्स ऑफर देत आहे. कंपनीनं आपल्या वेबसाईटवर १४ बंडल ऑफर्स लिस्ट केले आहेत. यात Mi Smart Speaker सोबत अन्य प्रोडक्ट्सही सामिल आहे.