अवघ्या 101 रुपयांत असा खरेदी करा Vivo चा स्मार्टफोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 14:58 IST2018-12-21T14:37:11+5:302018-12-21T14:58:55+5:30
विवो कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये अवघ्या 101 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने विवो नेक्स, विवो V11, विवो V11 प्रो आणि विवो Y95 या सह अनेक नवीन स्मार्टफोनसाठी या खास ऑफरची घोषणा केली आहे.

अवघ्या 101 रुपयांत असा खरेदी करा Vivo चा स्मार्टफोन
नवी दिल्ली - विवोचा नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. विवो कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये अवघ्या 101 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने विवो नेक्स, विवो V11, विवो V11 प्रो आणि विवो Y95 या सह अनेक नवीन स्मार्टफोनसाठी या खास ऑफरची घोषणा केली आहे.
'न्यू फोन, न्यू यू' असं या ऑफरचं नाव असून यामध्ये केवळ 101 रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये आणि 6 महिन्यांच्या ईएमआयवर हे फोन खरेदी करू शकता. विवोने फक्त ऑफलाईन खरेदीवर ही ऑफर दिली आहे. 20 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत ही ऑफर असणार आहे. 41 दिवस चालणाऱ्या या ऑफरमध्ये 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या फोनवर ही ऑफर देण्यात येत आहे.
101 रुपयांत असा खरेदी करा Vivo चा स्मार्टफोन
- सर्वप्रथम कोणत्याही विवो-बीएफएल पार्टनरच्या स्टोरमध्ये जा.
- पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र सोबत घेवून जा.
- विवो NEX, V11, V11 प्रो, विवो Y95, विवो Y83 प्रो किंवा Y81-4G या स्मार्टफोनपैकी तुम्हाला खरेदी करायचा आहे तो स्मार्टफोन निवडा.
- 101 रुपयांचं डाउनपेमेंट करा व त्यानंतर स्टोरमध्ये तुमची कागदपत्रे जमा करा.
- 'न्यू फोन, न्यू यू' या ऑफर अंतर्गत स्मार्टफोनच्या किंमतीनुसार 6 महिने ईआयएम भरा.
जर तुम्हाला 101 रुपये भरायचे नसतील किंवा तुम्हाला कॅशबॅक हवी असल्यास कंपनीने यासाठी आणखी एक ऑफर दिली आहे. एचडीएफसी बँकेंच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवर फोन खरेदी केल्यास शून्य डाउनपेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.