'त्या' लिंक शेअर करताना होणार नाहीत घोळ...व्हॉट्सअॅपवर प्रिव्ह्यु पाहता येणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 10:22 AM2018-12-03T10:22:34+5:302018-12-03T11:05:41+5:30
व्हॉट्सअॅपने पाठवलेले मॅसेज काही काळात डिलीट करण्याचे फिचर लाँच केलेले असतानाच आता आणखी एक सावधगिरीचे फिचर येत आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅपने पाठवलेले मॅसेज काही काळात डिलीट करण्याचे फिचर लाँच केलेले असतानाच आता आणखी एक सावधगिरीचे फिचर येत आहे. बऱ्याचदा अन्य अॅपवरून एखादी लिंक शेअर करताना एखाद्याला भलतीच लिंक गेल्याचे प्रकार घडल्याने लाजिरवाणे वाटण्याचे प्रकार घडत होते. आता व्हॉट्सअॅपने ही लिंक एका पेक्षा जास्त लोकांना पाठविताना सेंड करण्याआधीच प्रिव्ह्यु पाहण्याची सोय केली आहे.
व्हॉट्सअॅपने एखाद्याला पाठविलेला मॅसेज काही काळामध्येच त्याच्या मॅसेज विंडोमधून डिलीट करण्याचे फिचर काही महिन्यांपूर्वी आणले होते. यामुळे एखाद्याला चुकीचा मॅसेज गेला असल्यास तो तातडीने मागे घेता येत आहे. ही सोय लिंक मागे घेण्यासाठीही असली तरीही काहीवेळा पाठविल्याबरोबरच मॅसेज पाहिले जात असल्याने चुकीची लिंक चुकीच्या व्यक्तीला पाठविण्याने समस्या निर्माण होत होत्या. मात्र, व्हॉट्स अॅपने यावर उपाय शोधला आहे.
WhatsApp beta for Android 2.18.325: when you forward a message or media to two or more chats, WhatsApp will show you a preview before forwarding the item, so you can confirm or cancel the operation.
— WABetaInfo (@WABetaInfo) November 5, 2018
[AVAILABLE IN FUTURE]
[AVAILABLE IN FUTURE]
[AVAILABLE IN FUTURE] pic.twitter.com/KgdKer2CdJ
सध्या हे फिचर बिटा व्हर्जनवरच उपलब्ध असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हे फिचर वापरण्यासाठी 2.18.366 हे बिटा व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे.