बँक अकाऊंट रिकामं करू शकतात 'अशी' ॲप्स, स्मार्टफोनमध्ये असतील तर आजच करा डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:21 AM2023-03-28T11:21:25+5:302023-03-28T11:22:10+5:30

तुम्हाला तुमच्या बँक खात्याबाबत खूप काळजी घ्यावी लागेल. एका चुकीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

you should delete less rating apps can empty your bank account delete them today if you have them in your smartphone android google play store | बँक अकाऊंट रिकामं करू शकतात 'अशी' ॲप्स, स्मार्टफोनमध्ये असतील तर आजच करा डिलीट

बँक अकाऊंट रिकामं करू शकतात 'अशी' ॲप्स, स्मार्टफोनमध्ये असतील तर आजच करा डिलीट

googlenewsNext

स्मार्टफोन आल्यानंतर यूजर्सची सुरक्षा ही मोठी समस्या बनली आहे. प्रत्येक जण आपल्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप्स हटवत आहेत. स्मार्टफोन ग्राहकांनी ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी नेहमीच विचार करणं आवश्यक आहे. तसं न केल्यास तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यामुळेच प्रत्येक युझरने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. असे काही ॲप्स आजच तुमच्या मोबाइलमधून डिलीट करा.

नुकताच मेटाचा एक रिपोर्ट समोर आला आहे. अनेक ॲप्स युझर्सचा वैयक्तिक डेटा गोळा करत असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. आता तुम्ही विचार करत असाल त्यात चूक काय? मात्र हा सर्व वैयक्तिक डेटा युजर्सच्या परवानगीशिवाय गोळा केला जात होता. असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. डेटा गोळा करण्यापूर्वी प्रत्येक ॲपनं युझरची परवानगी घेणे आवश्यक आहे.

गुगल प्ले स्टोअरवरही सातत्यानं काम करत आहे. जे सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य नाहीत, असे ॲप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात येत आहेत. तुम्हालाही सुरक्षित राहायचं असेल तर आजच मोबाईलमधून असं ॲप्स काढून टाकले पाहिजे. ज्या ॲपचं रेटिंग कमी आहे ते ॲप डाऊनलोड करणं टाळा. कोणतंही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचं रेटिंग नक्की तपासा. ज्या ॲपचं रेटिंग खूप चांगलं आहे, तेच इंस्टॉल करा.

रिव्ह्यू तपासून पाहा
याशिवाय, प्ले स्टोअरवर प्रत्येक अॅपबद्दल रिव्ह्यू देखील दिले जातात. प्रत्येक युझर ॲपबद्दल प्रतिक्रिया देतो. त्यामुळे, जेव्हा तुम्ही कोणतेही अॅप इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या एका चुकीमुळे खूप मोठे नुकसान होऊ शकतं. नेहमीच ॲपचं रेटिंग आणि फीडबॅक पाहिल्यानंतरच ते इंस्टॉल करावं. चुकून एखादे अॅप डाउनलोड केल्यानंतरही तुम्ही ते डिलीट करू शकता. तुम्ही असे न केल्यास तुमची वैयक्तिक माहितीही चोरीला जाऊ शकते.

Web Title: you should delete less rating apps can empty your bank account delete them today if you have them in your smartphone android google play store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.