दिवाळीत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार! पेटीएम ॲपवर फॉलो करा 'ही' ट्रीक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:05 PM2023-11-02T12:05:28+5:302023-11-02T12:05:48+5:30

पेटीएम ॲप कन्फर्म ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी गॅरंटीड सीट असिस्टंट फीचर देते. हे फिचर प्रवाशांना कन्फर्म तिकिटांच्या उपलब्धतेबद्दल माहिती देते.

You will get a confirmed ticket to go to the village in Diwali! Follow this trick on Paytm app | दिवाळीत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार! पेटीएम ॲपवर फॉलो करा 'ही' ट्रीक

दिवाळीत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार! पेटीएम ॲपवर फॉलो करा 'ही' ट्रीक

आपल्याकडे दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाहेरच्या शहरात कामासाठी असणारे अनेकजण आपल्या घरी जात असतात. या काळात सगळीकडे प्रवाशांची गर्दी असते, ट्रेन, बस आणि फ्लाइटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. अशा परिस्थितीत कन्फर्म ट्रेन तिकिटांसाठी संघर्ष सुरू आहे, मात्र पेटीएम ॲपद्वारे दिवाळीत कन्फर्म तिकीट बुक करता येणार आहे. आता या संदर्भात पेटीएमने दावा केला आहे. यात त्यांनी  गॅरंटीड सीट असिस्टंट फीचर दिले  आहे, जे दिवाळीत रेल्वे, बस किंवा फ्लाइटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट बुक करण्यात मदत करेल.

Whatsapp वर येणार दमदार फीचर; तयार करू शकणार एक्स्ट्रा प्रोफाईल, बदला नाव आणि फोटो

नवीन फीचर तुम्हाला कोणत्या ट्रेनचे कन्फर्म तिकीट आहे याची माहिती देईल. जर ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट नसेल, तर तुम्हाला इतर पर्यायांप्रमाणे बस आणि फ्लाइट तिकिटाचे पर्याय दाखवले जातील. मात्र, आता प्रश्न पडतो की त्यासाठी काय करावे लागेल. आधी  तुम्हाला तुमचे ट्रेनचे तिकीट बुकिंग अपडेट करावे लागेल.

अगोदर तुम्हाला पेटीएम अॅपच्या रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये जावे लागेल. यानंतर डेस्टीनेशन लोकेशन टाकावे लागेल.जर कन्फर्म तिकिटे उपलब्ध नसतील, तर पेटीएम अॅप तुम्हाला जवळपासच्या स्टेशन्सवरील कन्फर्म तिकिटांसाठी पर्याय दाखवेल. अशा परिस्थितीत बोर्डिंग स्टेशन बदलून कन्फर्म तिकीट मिळू शकते.

पेटीएम ट्रॅव्हल कॉर्नवॉल सेलची तिकीट बुकिंग सुविधा २७ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. या कालावधीत फ्लाइट तिकिटांवर १५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, फ्लाइट रद्द केल्यावर १०० टक्के परतावा दिला जाईल. याशिवाय ट्रेन आणि बस तिकिटांवर २० टक्के झटपट सूट मिळू शकते.

Web Title: You will get a confirmed ticket to go to the village in Diwali! Follow this trick on Paytm app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.