तुमच्या मोबाईलचाही चार्जिंग करताना होऊ शकतो स्फोट, वेळीच चेक करा 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 06:28 PM2024-09-05T18:28:47+5:302024-09-05T18:32:36+5:30

How to check if a mobile charger is original : अनेकदा चार्जिंग करताना मोबालईचा स्फोट झाला, अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. या स्फोट होण्यामागे डु्प्लिकेट चार्जर हेही एक कारण असते.

Your mobile can also explode while charging, check your charger original or not | तुमच्या मोबाईलचाही चार्जिंग करताना होऊ शकतो स्फोट, वेळीच चेक करा 'ही' गोष्ट

तुमच्या मोबाईलचाही चार्जिंग करताना होऊ शकतो स्फोट, वेळीच चेक करा 'ही' गोष्ट

How to check mobile charger is original or not : चार्जिंग करताना मोबाईलचा स्फोट झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले वा वाचले असेल. सगळ्याच मोबाईलला सी टाइप चार्जर लागत असल्याने बऱ्याचदा लोक कोणत्याही चार्जरने मोबाईल चार्ज करतात. पण, असे करणे कदाचित तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. तुमच्या मोबाईलचा स्फोटही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वापरत असलेला चार्जर ओरिजनल आहे की नाही, तपासून घ्या. ते कसे तपासायचे हेच जाणून घ्या. (How to check charger is original or not in Bis)

मोबाईलचे चार्जर ओरिजनल आहे की नाही, हे तपासण्यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपचे नाव आहे BIS Care Apps, याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चार्जरबद्दल जाणून घेऊ शकता. 

BIS Care App काय आहे?

BIS म्हणजे ओनर ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत BIS काम करते. भारतात विकल्या जाणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता प्रमाणित करणारी संस्था आहे. BIS Care App कोणीही आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतो.    

चार्जर डुप्लिकेट की ओरिजनल कसे तपासायचे?

सर्वात आधी तुमच्या iOS वा अ‍ॅड्रॉईड मोबाईलमध्ये BIS Care App डाऊनलोड करा. 

अ‍ॅप सुरू करा. त्यानंतर Verify R No. Under CRS यावर क्लिक करा. 

नंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर किंवा प्रोडक्ट क्यूआर कोड... या दोन्ही पैकी एक निवडून तुम्ही चार्जर ओरिजनल आहे की, डुप्लिकेट हे बघू शकता. 

चार्जरचे नाव, प्रोडक्ट कॅटरगरी, चार्जर कोणत्या देशात बनवण्यात आले आहे, इंडियन स्टॅण्डर्ड नंबर आणि मॉडेल इत्यादी तुम्ही चेक करू शकता. 

चार्जरचा रजिस्ट्रेशन नंबर कसा शोधायचा?

जेव्हा तुम्ही नवीन चार्जर खरेदी करता, तेव्हा त्यावर प्रोडक्ट नंबर आणि क्यूआर कोड दोन्ही गोष्टी असतात. या दोन्ही गोष्टी नसतील, तर तो चार्जर डुप्लिकेट आहे. चार्जर खरेदी पावतीवरही रजिस्ट्रेशन नंबर असतो. R-####### अशा पद्धतीने हा नंबर असतो. 

Web Title: Your mobile can also explode while charging, check your charger original or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.