WhatsApp मध्ये तुमचे पर्सनल फोटो सुरक्षित नाहीत; लगेच 'हे' अपडेट डाउनलोड करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:30 IST2025-01-30T19:24:29+5:302025-01-30T19:30:48+5:30

WhatsApp वरुन पाठवलेले View Once चे फोटो पुन्हा पाहता येतात. याबाबत व्हॉट्सअपमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.आता या त्रुटीसाठी एक अपडेट आणण्यात आले आहे.

Your personal photos are not safe in WhatsApp download this update immediately | WhatsApp मध्ये तुमचे पर्सनल फोटो सुरक्षित नाहीत; लगेच 'हे' अपडेट डाउनलोड करा

WhatsApp मध्ये तुमचे पर्सनल फोटो सुरक्षित नाहीत; लगेच 'हे' अपडेट डाउनलोड करा

व्हॉट्स अप एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप बनले आहे. करोडो लोक व्हॉट्सअप चा वापर करतात. काही दिवसापूर्वीच या ॲपवर View Once चे नवीन फिचर आले आहे, यावरुन आपले प्राइव्हेट फोटो पाठवता येतात. यातून हे फोटो सुरक्षित राहतात असा दावा करण्यात आला आहे. पण, यामध्ये हे फोटो सुरक्षित राहत नसल्याचे समोर आले आहे. आता ॲपने iOS वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटमुळे आयफोनमध्ये असलेल्या एका मोठ्या त्रुटीचे निराकरण झाले आहे.

OnePlus 13R Review...! दोन दिवस पुरणारी मोठी बॅटरी, कॅमेराही बदललेला; प्रोसेसरही नवा, कसा वाटला...

ॲपमध्ये असलेला बग व्ह्यू वन्स फीचरशी संबंधित होता. या फीचरच्या मदतीने पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर फक्त एकदाच पाहता येतात. या बगमुळे, काही प्रकरणांमध्ये वापरकर्ते हे फोटो आणि व्हिडीओ वारंवार पाहू शकत होते, यामुळे वापरकर्त्यांच्या प्राइव्हसी राहत नव्हती. 

WhatsApp ने नवीन अपडेट दिले

व्हॉट्स ॲपने आता हे बग दुरुस्त केले आहे. iOS वापरकर्त्यांसाठी आणलेल्या नवीन अपडेटमध्ये ही त्रुटी दूर करण्यात आली आहे. सर्व आयफोन वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप शक्य तितक्या लवकर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन फिचर मिळेल. 

मेटाच्या मालकीच्या ॲपचे नवीन अपडेट ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यांच्या फोनवर व्हॉट्सअप अपडेट करण्यासाठी, वापरकर्त्यांना अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्स अप शोधावा लागेल आणि अपडेट बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर नवीन व्हर्जन अपडेट होईल.

Web Title: Your personal photos are not safe in WhatsApp download this update immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.