तुमचा स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर; आयटी मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:01 AM2022-03-23T06:01:50+5:302022-03-23T06:03:06+5:30

अँड्रॉईड १०, अँड्रॉईड ११ आणि अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना यात खासकरून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. फोन हॅक करून सर्व संदेश वाचले जातात. शिवाय बँकिंग संबंधित सर्व माहिती काढून फसवणूक केली जात आहे.

Your smartphone is a target of hackers | तुमचा स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर; आयटी मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून इशारा

तुमचा स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर; आयटी मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : देशातील कोट्यवधी अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना देशाच्या आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने इशारा दिला आहे. अँड्रॉईड १०, अँड्रॉईड ११ आणि अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना यात खासकरून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. फोन हॅक करून सर्व संदेश वाचले जातात. शिवाय बँकिंग संबंधित सर्व माहिती काढून फसवणूक केली जात आहे.

सुरक्षेत राहिल्या त्रुटी
अँड्रॉईडची प्रणाली, रनटाईम, फोनमधील महत्त्वाचे घटक यांच्यामध्ये सुरक्षेसंबंधित त्रुटी राहिल्याने फोन हॅक करण्यात येत आहेत. 
स्मार्टफोनमधील अतिशय महत्त्वाची माहिती हॅकर्स अगदी आरामात काढून घेत तुमच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारू शकतात.  त्यामुळे प्रत्येक वेळी फोन हॅक झाला नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.

सुरक्षाकवच अपुरे
गुगल आणि अँड्रॉईड ओएसने धोके अगोदरच स्पष्ट करत सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्या पुरेशा ठरल्या नाहीत. गुगलच्या सुरक्षाकवचने ५ मार्च २०२२ पर्यंत हँकर्सपासून स्मार्टफोनला दूर ठेवले आहे.
कंपनीच्या मते, सर्व सुरक्षाकवचांना भेदून हॅकर्स फोनमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक प्रकरणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. 

गुगल क्रोम वापरणाऱ्यांना अलर्ट
फोनवरून गुगल क्रोम वापरणाऱ्यांनाही सरकारने अलर्ट दिला आहे : जे गुगल क्रोम वापरतात त्यांना अचानक पासवर्ड आणि इतर माहिती मागितली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकवेळी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Web Title: Your smartphone is a target of hackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.