Amazon वर बनावट रिव्यू करून युवकाने कमावले लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:51 PM2020-09-05T18:51:12+5:302020-09-05T19:00:55+5:30
जस्टिन फ्रायर असे नाव असलेला युवक Amazon.co.uk वरील नंबर -१ रिव्यूअर आहे.
काही चिनी कंपन्या पैसे देऊन आपल्या वस्तूंचे बनावट रिव्यू अॅमेझॉनवर करत होत्या. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. एका रिव्यू करणाऱ्या युवकाने जवळपास तीन महिन्यांत बनावट रिव्यू करून किमान १९ लाख रुपये कमावले.
या अहवालात असे दिसून आले आहे की, टॉप रिव्यूअर्स पैसे घेऊन अॅमेझॉनला ५ स्टार रेटिंग देत होते. पहिल्यांदा ते प्रॉडक्ट विकत घेत होते. त्यानंतर अॅमेझॉनवर ५ स्टार रेटिंग देत होते. यानंतर कंपन्यांकडून रिफंड केले जात होते. बर्याच वेळा त्यांना इतर भेटवस्तू देखील मिळाल्या होत्या.
जस्टिन फ्रायर असे नाव असलेला युवक Amazon.co.uk वरील नंबर -१ रिव्यूअर आहे. ऑगस्टमध्ये या युवकाने १४ लाख रुपयांच्या वस्तूंचा रिव्यू केला. दर ४ तासांत तो एका नवीन सामानाचे ५ स्टार रिव्यू करत होता. अहवालानुसार, अॅमेझॉनवर खरेदी केलेल्या वस्तू जस्टिन ईबे (eBay) वर विकत होता. जून महिन्यापासून आतापर्यंत जस्टिनने १९ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे. मात्र, जस्टिनने पैसे घेऊन रिव्यू करण्याचा आरोप फेटाळला आहे.
जे पैसे घेऊन बनावट रिव्यू करू शकतात. अशा रिव्यूअर्सला चिनी कंपन्या सोशल मीडिया ग्रुपवर आणि मेसेजिंग अॅप्सवर संपर्क साधतात टेलिग्रामवर असे काही ग्रुप आढळले आहेत, ज्यात हजारो ५ स्टार रिव्यू करण्याचा दावा करतात.
आणखी बातम्या...
- 'स्वत:हून नोकरी सोडा अन्यथा...', Oyo कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ओढवले संकट
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला
- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश
- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक
-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान
- पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल