ओप्पो एफ5ची युथ एडिशन
By शेखर पाटील | Published: December 8, 2017 11:23 AM2017-12-08T11:23:39+5:302017-12-08T11:25:06+5:30
अलीकडेच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आलेल्या ओप्पो ए५ या स्मार्टफोनची युथ या नावाने नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्यात आली आहे.
अलीकडेच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आलेल्या ओप्पो ए५ या स्मार्टफोनची युथ या नावाने नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. ओप्पो एफ५ या स्मार्टफोनच्या मिनी आवृत्तीच्या स्वरूपात युथ एडिशन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. अर्थात यामध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा थोडे कमी फिचर्स असतील. यातील डिस्प्ले हा ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२१६० बाय १०८० पिक्सल्स), १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि कडा विरहीत (बेझेललेस) या प्रकारातील असेल. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी२३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे.
याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने यातील स्टोअरेज वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात मेटलबॉडी देण्यात आली असून मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. आधीच्या मॉडेलपेक्षा ओप्पो एफ५च्या युथ एडिशनमध्ये कॅमेरेदेखील थोडे वेगळे देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये एफ/२.० अपार्चरयुक्त १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्सने युक्त असणारे एआय ब्युटी रिकग्नेशन हे फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने हा कॅमेरा सेल्फी घेणार्या युजरचे वय, त्वचेचा रंग, लिंग आदी बाबींना ओळखू शकतो. यात सेल्फी प्रतिमांना बोके इफेक्टदेखील देण्याची सुविधा आहे. तर यातील मुख्य कॅमेरा हा एफ/२.२ अपार्चर, फेज डिटेक्शन ऑटो-फोकस व एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.
यामध्ये जिओ-टॅगींग, एचडीआर, पॅनोरामा, टच फोकस, फेस डिटेक्शन आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. व्हीओओसी या फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाचा सपार्ट असणारी ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी यात आहे. ओप्पो एफ ५ युथ एडिशन या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्स आदी फिचर्सही असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर आधारित कलर ओएस ३.२ वर चालणारा असेल. हे मॉडेल १६,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना आजपासून खरेदी करता येणार आहे.