YouTube अॅप बंद होणार! कंपनीनं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:23 PM2022-05-04T19:23:54+5:302022-05-04T19:24:04+5:30
लो एन्ड स्मार्टफोन्ससाठी सादर करण्यात आलेला YouTube Go अॅप यावर्षी ऑगस्टपासून बंद करण्यात येईल.
लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिस युट्युबनं आपलं एक अॅप्लिकेशन कायमस्वरूपी बंद घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो स्मार्टफोन युजर्स युट्युबचा वापर करू शकणार नाहीत. हे अॅप अचानक बंद करण्यात येणार नाही तर यावर्षी ऑगस्टमध्ये कंपनी Youtube Go अॅप बंद करणार आहे. ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल असेल ते याचा वापर करू शकतील.
जर तुमच्याकडे अँड्रॉइड गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम असेल तर तुम्हाला निराश करणारी बातमी आली आहे. तुमच्या स्मार्टफोनवरील YouTube Go अॅप बंद होणार आहे. हे अॅप 2016 मध्ये अँड्रॉइड गो व्हर्जन असेलल्या फोनसाठी लाँच करण्यात आलं होतं. YouTube Go ची साईज खूप कमी आहे, त्यामुळे कमी रॅम व स्टोरेज असेलल्या डिवाइसवर हे सहज वापरता येत होतं.
युट्युब गो अॅपच्या जागी मुख्य YouTube अॅप आणण्याच्या कंपनीचा उद्देश आहे. त्यासाठी गुगल सतत मुख्य युट्युब अॅपमध्ये ऑप्टिमाइजेशन करत आहे. युट्युबनुसार आता गो व्हर्जन प्रमाणे YouTube अॅप देखील स्लो नेटवर्कवर आरामात अॅक्सेस करता येतं. त्यामुळे वेगळ्या अॅपची गरज नाही.
YouTube Go अॅप 50 कोटी लोकांनी डाउनलोड केला आहे. तसेच अँड्रॉइड गो एडिशन असलेल्या फोन्समध्ये हे अॅप प्री-इंस्टॉल मिळतं. YouTube Go स्लो नेटवर्क आणि कमी रॅम व स्टोरेज असलेल्या फोन्ससाठी बनवण्यात आलं आहे. याच धर्तीवर गुगल गो, मॅप्स गो, असिस्टंट गो, नेव्हिगेशन गो, जीमेल गो आणि गॅलरी गो अॅप देखील लाँच करण्यात आले आहेत, जे अजूनही उपलब्ध आहेत.