YouTube आणणार भन्नाट नवीन; व्हिडीओ रिवाइंड आणि फॉरवर्ड करणे होणार सोप्पे  

By सिद्धेश जाधव | Published: August 10, 2021 12:59 PM2021-08-10T12:59:17+5:302021-08-10T13:02:02+5:30

YouTube Seek-To-Slide: YouTube व्हिडीओ रिवाइंड आणि फॉरवर्ड करण्याच्या नवीन पद्धतीवर काम करत आहे. हे फिचर सध्या टेस्टिंगमध्ये आहे.  

Youtube to introduce new slide to seek feature for rewind and skip video more easily   | YouTube आणणार भन्नाट नवीन; व्हिडीओ रिवाइंड आणि फॉरवर्ड करणे होणार सोप्पे  

YouTube आणणार भन्नाट नवीन; व्हिडीओ रिवाइंड आणि फॉरवर्ड करणे होणार सोप्पे  

Next
ठळक मुद्देयुट्युबमधील नवीन प्लेबॅक कंट्रोल एका रेडीट युजरने बघितले आहेत. YouTube व्हिडीओ प्ले केल्यावर स्क्रीनवर सर्वात वर Slide left or right to seek असा बॅनर दिसतो.

YouTube एका नवीन फीचरची टेस्टिंग करत आहे, हे फिचर Slide-to-Seek नावाने सादर केले जाईल. हे फिचर सादर झाल्यावर Drag-and-Hold चा वापर करून युट्युब व्हिडीओ रिवाइंड किंवा फॉरवर्ड करता येईल. हे फिचर युट्युबच्या Android आणि iOS अश्या दोन्ही अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. सध्या सिक बारचा वापर करून व्हिडीओ पुढे मागे करता येतो. तसेच स्क्रीनवर टॅप करून देखील 10 सेकंदाने व्हिडीओ फॉरवर्ड किंवा रिवाइंड करता येतो.  

Android Police ने दिलेल्या माहितीनुसार, युट्युबमधील नवीन प्लेबॅक कंट्रोल एका रेडीट युजरने बघितले आहेत. त्यानुसार, Slide-to-Seek फीचर अँड्रॉइडवर YouTube beta v16.31.34 अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. काही युजर्सनी हे फिचर iOS डिवाइसवर उपलब्ध असल्याची देखील माहिती दिली आहे. त्यामुळे हे फिचर अकॉउंट टू अकॉउंट बेसिसवर युजर्सना देण्यात येईल, असे वाटत आहे.  

Reddit पोस्टनुसार, ड्रॅग अँड होल्ड जेस्चरचा वापर करताना YouTube व्हिडीओ प्ले केल्यावर स्क्रीनवर सर्वात वर Slide left or right to seek असा बॅनर दिसतो. हे फीचर व्हिडीओ स्क्रीनवर कुठेही होल्ड आणि टॅप केल्यावर अ‍ॅक्टिव्हेट होते. रिवाइंड किंवा फॉरवर्ड करण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्लाइड करावे लागेल. म्हणजे जर व्हिडीओ को रिवाइंड करायचा असेल किंवा व्हिडीओमध्ये मागे जायचे असेल तर स्क्रीनवर टॅप अँड होल्ड करून डावीकडे स्लाईड करावे लागेल. तसेच व्हिडीओ फॉरवर्ड करायचा असेल किंवा व्हिडीओमध्ये पुढे जायचे असेल तर टॅप अँड होल्ड करून उजवीकडे स्लाईड करावे लागेल. स्लाईड करत असताना तुम्हाला तुम्ही कुठे जात आहात हे थंबनेलमधून दिसेल, यामुळे युट्युबचा वापर सोप्पा होईल.  

Web Title: Youtube to introduce new slide to seek feature for rewind and skip video more easily  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.