YouTube ने आणले भन्नाट फिचर, कमेंट करणे आणि वाचणे होणार सोप्पे  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:42 PM2021-09-16T16:42:06+5:302021-09-16T16:44:06+5:30

YouTube New Feature: YouTube च्या मोबाईल अ‍ॅपमध्ये एक नवीन ट्रान्सलेशन फीचर रोलआउट होणार आहे. या फीचरच्या मदतीने मोबाईल युजर दुसऱ्या भाषेतील कमेंट भाषांतरित करू शकतील.  

Youtube mobile app is rolling out new translation feature for android and ios users  | YouTube ने आणले भन्नाट फिचर, कमेंट करणे आणि वाचणे होणार सोप्पे  

YouTube ने आणले भन्नाट फिचर, कमेंट करणे आणि वाचणे होणार सोप्पे  

googlenewsNext

YouTube आपल्या युजर्ससाठी एक नवीन सुविधा घेऊन येत आहे. YouTube एक असे फीचर रोलआउट करत आहे, ज्याच्या मदतीने युजर्सना 100 पेक्षा जास्त भाषांमधील कमेंट भाषांतरीत करता येतील. सध्या हे नवीन फीचर मोबाईल युजरसाठी रोलआउट करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच युट्युब अ‍ॅपमध्ये प्रत्येक कमेंटच्या खाली ट्रान्सलेटचे बटन देण्यात येईल. यावर क्लिक करून तुमच्या स्थानिक भाषेत ती कमेंट भाषांतरित करता येईल.  

युट्युबने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या नव्या फीचरची माहिती दिली आहे. कंपनीने आपण नवीन ट्रान्सलेट बटन देत असल्याची घोषणा ट्विटमधून केली आहे, हे बटन YouTube Mobile App मध्ये उपलब्ध होईल. या बटनच्या मदतीने कमेंट 100 पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित करता येईल. Android आणि iOS दोन्ही डिवाइसवर यूट्यूब मोबाईल अ‍ॅपसाठी हे फीचर रोल आउट करण्यात येईल.  

उदाहरणार्थ, जर युट्युबवरील व्हिडीओच्या खाली एखाद्या वेगळ्या भाषेतील कमेंट असेल तर तिथे कमेंटच्या खाली तुम्ही सेट केलेल्या भाषेत भाषांतरीत करण्याचा पर्याय मिळेल. हा ट्रान्सलेशन बटन कमेंट बॉक्समध्ये लाईक, अनलाईक आणि रिप्लाय बटनच्यावर देण्यात आला आहे. याद्वारे यूट्यूब मोबाईल अ‍ॅपमधून 100 पेक्षा जास्त भाषा भाषांतरित करता येतील. ज्यात स्पॅनिश, पोर्तुगीज, जर्मन, फ्रेंच इत्यादींचा अंवेश असेल.  

Web Title: Youtube mobile app is rolling out new translation feature for android and ios users 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.