YouTube ने आणले 36 नवीन फीचर्स, जाणून घ्या कोणता तुमच्या कामाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 02:38 PM2023-10-19T14:38:37+5:302023-10-19T14:39:43+5:30
YouTube : युजर एक्सपेरीयन्स सुधारण्यासाठी यूट्यूबने हे नवीन फीचर्स आणले आहेत.
YouTube : आज स्मार्टफोन वापरणारा प्रत्येकजण YouTube पाहतो. YouTube चा युजर बेस खूप मोठा आहे. यामुळेच आता कंपनीने यात एकाच वेळी 36 नवीन फीचर्स आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे YouTube चा अनुभव तुमच्यासाठी पूर्णपणे बदलेल. अनेकांना अॅपचा लूक थोडासा कंटाळवाणा वाटला असेल, पण आता हा संपूर्ण लूक बदलला जाणार आहे. आम्ही तुम्हाला या नवीन बदलाबद्दल सांगणार आहोत.
पूर्वीपेक्षा वेगवान फास्ट फॉरवर्ड
आतापर्यंत तुम्ही यूट्यूबवर फक्त 10 सेकंदांसाठी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू शकत होता, परंतु आता तो 20 सेकंदांपर्यंत वाढवला आहे. तुम्हाला तो अधिक करायचे असेल तर तुम्ही YouTube सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या इच्छेनुसार करू शकता.
ऑडिओ कंट्रोल
हे फीचर्स निश्चितपणे युजरचा अनुभव सुधारेल. व्हिडिओ सुरू असताना आवाज कमी जास्त होत असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. पण, आता यूट्यूबने आता व्हॉल्यूम स्टेबल फीचर आणले आहे, ज्यामध्ये व्हिडिओ प्ले करताना आवाजाचा त्रास होणार नाही.
प्रीव्हूचा आकार मोठा होणार
व्हिडिओ पाहताना तुम्ही अनेकदा व्हिडिओ मागे-पुढे करता, यावेळी खाली छोट्या स्क्रीनवर प्रीव्हू दिसतो. पण, आता यातही बदल करण्यात आला आहे. ही प्रीव्हू स्क्रीन मोठी करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमचा युजर एक्सपेरीयन्स आणखी चांगला होईल.
मोबाईलवर लॉक स्क्रीन
YouTube ने आता व्हिडिओ पाहताना स्क्रीन लॉक फीचर आणले आहे. म्हणजे, स्क्रीनला चुकून हात लावला, तरीदेखील तुमचा व्हिडिओ एक्सपेरीयन्स खराब होणार नाही. Amazon किंवा Netflix सारख्या इतर व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे फीचर पाहिलेच असेल.
यूट्यूबचे काही निवडक नवीन फीचर्स
- फास्ट फारवर्ड
- लायब्ररी आणि अकाउंट टॅबला मर्ज करुन नवीन टॅब
- व्हॉइस सर्च कमांड
- मोठा प्रीव्ह्यू थम्बनेस्ल
- लॉक स्क्रीन
- स्मार्ट टीव्हीसाठी नवीन व्हर्टिकल मेन्यू
- सब्सक्राइब बटन अपडेट
- व्हिडिओ लिंक कॉपी करण्याचा पर्याय, इत्यादी.