YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठीही पैसे मोजावे लागतील, जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:40 PM2022-10-04T18:40:51+5:302022-10-04T20:31:19+5:30
तुम्ही युट्यूबवर (YouTube) व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.
नवी दिल्ली : या जगात फुकटात काहीही मिळत नाही, अशी एक म्हण आहे. इंटरनेटच्या जगात ही म्हण रोज वापरली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत इंटरनेटवर भरपूर कंटेंट मोफत उपलब्ध होता. पण आता तशी परिस्थिती नाही. हळूहळू, आता सर्व प्रकारचा कंटेंट प्रीमियम होत आहे आणि कंटेंटसाठी युजर्सकडून पैसे आकारले जात आहेत. दरम्यान, तुम्ही युट्यूबवर (YouTube) व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.
लवकरच तुम्हाला YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतील. YouTube प्रीमियमची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. प्रीमियम सेवेअंतर्गत, YouTube च्या युजर्सना जाहिरात मुक्त सेवा मिळते. याशिवाय बॅकग्राउंडमध्ये म्युजिक प्ले करण्याचा ऑप्शन मिळत आहे, मात्र आता यामध्येही मोठा बदल होणार आहे. आता तुम्हाला YouTube चे 4K व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
सध्या YouTube वर युजर्स 4K रिझोल्युशनचे व्हिडीओ जाहिरातीसह मोफत पाहतात, मात्र लवकरच ही सेवा बंद होणार आहे. दरम्यान, संदर्भात YouTube ने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र, काही युजर्सचे म्हणतात की, ते सध्या फक्त 1440 पिक्सेल व्हिडिओ विनामूल्य पाहू शकतात. 2140 पिक्सेलपेक्षा जास्त व्हिडिओंसाठी, प्रीमियम सेवा घेण्यास सांगितले जात आहे.
जर YouTube साठी पैसे मोजावे लागले तर हा निर्णय युजर्सना चांगलाच महागात पडणार आहे, कारण आज भारतीय बाजारपेठेत भरपूर 4K टीव्ही आहेत. तुम्हाला शहरांमधील प्रत्येक घरात 4K टीव्ही मिळेल आणि लोक या टीव्हीवर फक्त 4K व्हिडिओ पाहतात. YouTube च्या या निर्णयानंतर त्यांना अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारखे YouTube च्या व्हिडिओसाठीसाठी पैसे द्यावे लागतील.
याशिवाय, YouTube कोणत्याही व्हिडिओपूर्वी अशा 10 जाहिराती देण्याची तयारी करत आहे, ज्या स्किप करता येणार नाहीत. दरम्यान, YouTube प्रीमियमचा बेसिक प्लॅन एका महिन्यासाठी 129 रुपयांचा आहे. त्याचवेळी, तीन प्लॅनची किंमत 399 रुपये आहे आणि वार्षिक प्लॅन 1,290 रुपयांचा आहे. प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये युजर्सचा व्हिडिओ डाउनलोड करण्याचा पर्याय देखील मिळतो.