आता झटपट व्हायरल होईल Youtube Video! मालामाल बनवू शकतात हे नवे खास फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:47 AM2023-08-14T08:47:41+5:302023-08-14T08:48:36+5:30
याच्या सहाय्याने युजर्स इतरांच्या तुलनेत आपला व्हिडिओ अधिक आकर्षक पद्धतीने सादर करू शखतात. क्रिएटर्स आपल्या व्ह्युअर्ससाठी Q&A सेशन असलेले शॉर्ट्स व्हिडिओदेखील अपलोड करू शकतात. एवढेचन नाही, तर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पोल्स देखील क्रिएट करू शकतात.
सध्या युट्यूब हे एक अत्यंत लोकप्रीय माध्यम झाले आहे. युट्युबची लोकप्रियता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. महत्वाचे म्हणजे अनेक युजर्सनी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने पैसा आणि प्रसिद्धी, अशा दोन्ही गोष्टी कमावल्या आहेत. आता YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवर काही नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. हे नवे फीचर्स यूजर्सना शॉर्ट व्हिडिओ (Youtube Shorts) तयार करण्यात मोठी मदत करणार आहेत. एवढेच नाही, तर युजर्सनी टाकलेला कंटेंट व्हायरल करण्यासही ते उपयुक्त ठरू शकतात. यामुळे Shorts व्हिडिओंवरील एंगेजमेंट टाईमिंगच वाढणार नाही, तर व्ह्यू देखील मिळू शकतील. तर जाणून घेऊयात या खास फीचर्ससंदर्भात.
Remix आणि Collab
Shorts व्हिडिओ क्रिएशनमध्ये युजर्स Collab टूल्सचा वापर करू शकतात. यात युजर्स शॉर्ट्स व्हिडिओला साईड बाय साईड फॉर्मेटमध्ये रेकॉर्डदेखील करू शकतील. याशिवाय क्रिएटर्स मल्टीपल लेआउटचीही निवड करू शकतात. याच्या सहाय्याने कुठलाही पॉप्युलर शॉर्ट्स अथवा Youtube व्हिडिओ रिमिक्स केला जाऊ शकेल. यासाठी युजर्सना Remix आणि नंतर Collab वर क्लिक करावे लागेल. हे फीचर रोलआऊट करण्यात आले आहे. हे फीचर लवकरच सर्व युजर्सपर्यंत पोहोचेल.
नव्या स्टिकरसह एक्सपेरिमेंट -
शॉर्ट्स व्हिडिओ अधिक आकर्षक बनविण्यासाठी युजर्सना नवीन इफेक्ट्स आणि स्टिकर्सचा वापर करता येईल. याच्या सहाय्याने युजर्स इतरांच्या तुलनेत आपला व्हिडिओ अधिक आकर्षक पद्धतीने सादर करू शखतात. क्रिएटर्स आपल्या व्ह्युअर्ससाठी Q&A सेशन असलेले शॉर्ट्स व्हिडिओदेखील अपलोड करू शकतात. एवढेचन नाही, तर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पोल्स देखील क्रिएट करू शकतात.
यूट्यूब ब्लॉगवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, युजर्स मोबाइलवर व्हर्टिकल लाइव्ह एक्सपेरिअन्स घेऊ शकतात. या फीचरच्या मदतीने क्रिएटर्सना आपल्या ऑडियन्ससोबत कनेक्ट होण्याची सुविधा मिळेल. काही क्लिकच्या मदतीने युजर्स लाइव्ह करू शकतात.
व्हिडिओ शॉर्ट्समध्ये करणे शक्य -
युट्यूब ब्लॉगवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गूगल यूट्यूब क्रिएटर्सना लवकरच एक नवे फीचर देणार आहे, ज्याच्या सहाय्याने युजर्स आपले वहिडिओ शॉर्ट्समध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतील. सर्व व्हिडिओ हॉरिझॉन्टल व्हिडिओ शॉर्ट्समध्ये कंव्हर्ट होतील.