Ranveer Allahabadia : "हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?"; प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचं चॅनल हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:56 PM2024-09-26T12:56:26+5:302024-09-26T12:56:42+5:30

Ranveer Allahabadia : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहेत. तसेच त्याचे सर्व व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत.

youtuber Ranveer Allahabadia channel hacked all videos deleted pm modi awarded recently | Ranveer Allahabadia : "हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?"; प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचं चॅनल हॅक

Ranveer Allahabadia : "हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?"; प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचं चॅनल हॅक

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहेत. तसेच त्याचे सर्व व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. हॅकर्सनी नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड विजेत्या यूट्यूबरचं लोकप्रिय चॅनल BeerBiceps हॅक केलं आणि त्याचं नाव आता "@Elon.trump.tesla_live2024" असं बदललं आहे. यासोबतच त्याच्या पर्सनल चॅनेलचं नाव देखील बदलून "@Tesla.event.trump_2024" असं करण्यात आलं आहे.

रिपोर्टनुसार, हॅकर्सनी युट्युबरच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ डिलीट केले आहेत. तसेच हॅकर्सने AI जेनरेटेड डीपफेक व्हिडिओच्या मदतीने एलन मस्क सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसह थेट लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. लाईव्ह स्ट्रीममध्ये, हॅकरने लोकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं आणि त्यांचे पैसे दुप्पट केले जातील असे वचन दिलं आहे. 

यूट्यूब चॅनल हॅक झाल्यानंतर रणवीर अल्लाहबादियाने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून "हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?" अशी स्टोरी शेअर केली आहे. रणवीरला पंतप्रधान मोदींनी पुरस्कार दिला होता. सध्या यूट्यूबवरून दोन्ही चॅनेल काढून टाकण्यात आले आहेत. हे दोन्ही चॅनेल सर्च केले असता, ते कंपनीच्या धोरणाच्या विरोधात असल्याचं यूट्यूबने सांगितलं. 

हॅकर्सने लाइव्ह स्ट्रीम दरम्यान एक QR कोड दाखवला आणि तो स्कॅन करून elonweb.net वर Bitcoin किंवा Ethereum पाठवण्यास सांगितलं. हॅकरने प्रसिद्ध व्यक्ती किंवा संस्थेचे सोशल चॅनल हॅक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा हॅकर्सनी प्रसिद्ध व्यक्तींचे सोशल मीडिया हँडल हॅक केले आहेत आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लिंक शेअर केल्या आहेत. ही खूप जुनी पद्धत आहे, ज्यामध्ये लोकांना अडकवण्यासाठी YouTube चॅनेल किंवा सोशल मीडिया हँडलला टार्गेट केलं जातं.

 

Web Title: youtuber Ranveer Allahabadia channel hacked all videos deleted pm modi awarded recently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.