13 वर्षाआधी आज अपलोड झाला होता यूट्युबचा पहिला व्हिडीओ, जाणून घ्या काही खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 11:20 AM2018-04-23T11:20:31+5:302018-04-23T11:20:31+5:30
यूट्युबने अगदी कमी वेळेतच ही मोठी उंची गाठली आहे.
मुंबई- यूट्युब या सोशल नेटवर्किंग साइटचं नाव ऐकलं तरी आपल्याला विविध व्हिडीओ, सिनेमे, गाणी मिळविण्याचं एकमात्र प्लॅटफॉर्म आठवतं. इंटरनेटवर सर्वात जास्त वापरलं जाणार सोशल नेटवर्क म्हणजेचं यूट्युब. यूट्युबने अगदी कमी वेळेतच ही मोठी उंची गाठली आहे. 13 वर्षांआधी आजच्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिल 2005 रोजी यूट्युबवर पहिला व्हिडीओ अपलोड झाला होता.
यानिमित्ताने आपण जाणू घेऊन यूट्युबच्या पहिल्या व्हिडीओशी संबंधीत काही खास गोष्टी
- यूटयुबवर अपलोड झालेल्या पहिल्या व्हिडीओचं शिर्षक 'मी अॅटद झू' (Me at the Zoo) हे होतं.
- या व्हिडीओला यूट्युबचे सह-संस्थापक जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005 रोजी अपलोड केलं होतं. 18 सेकंदाच्या या व्हिडीओला जावेद यांचा मित्र याकोव लापित्सकीने रेकॉर्ड केला होता.
- 'मी अॅट द झू' हा व्हिडीओ आत्तापर्यंत 48 लाख वेळा पाहिला गेला आहे.
- या व्हिडीओमध्ये जावेद सॅन डिअॅगो शहरातील एका प्राणीसंग्रहालयात उभा आहे. हत्तींच्यासमोर उभा राहून तो त्यांच्याबद्दल बोलतो आहे.
- यूट्युबचा वापर 88 देशात 76 भाषांमध्ये केला जातो.
- यूट्युबर दर मिनिटाला 400 तासाच्या बरोबरीचे व्हिडीओ अपलोड केले जातात.