YouTube चे 'Autoplay on Home Feature' आता अॅन्ड्राईड व iOS वर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 06:27 PM2018-12-05T18:27:52+5:302018-12-05T18:28:24+5:30

'Autoplay on Home Feature' आत्तापर्यंत यूट्यूबच्या फक्त प्रिमियम युजर्ससाठी एक्सक्लुझिव्ह होते. या फीचरच्या माध्यमातून यूट्यूबच्या होम पेजवर दाखविण्यात आलेले व्हिडीओज् आता ऑटोमॅटिक प्ले होणार आहेत.

youtubes mobile apps will now autoplay videos on the home tab by default on ios and android | YouTube चे 'Autoplay on Home Feature' आता अॅन्ड्राईड व iOS वर येणार

YouTube चे 'Autoplay on Home Feature' आता अॅन्ड्राईड व iOS वर येणार

Next

नवी दिल्ली : YouTube आता आपल्या सर्व अॅन्ड्राईड आणि आयओएस युजर्ससाठी 'Autoplay on Home Feature' ची सुविधा देणार आहे. 'Autoplay on Home Feature' आत्तापर्यंत यूट्यूबच्या फक्त प्रिमियम युजर्ससाठी एक्सक्लुझिव्ह होते. या फीचरच्या माध्यमातून यूट्यूबच्या होम पेजवर दाखविण्यात आलेले व्हिडीओज् आता ऑटोमॅटिक प्ले होणार आहेत. त्यामुळे एका पाठोपाठ एक असे क्लिक करण्याची गरज भासणार नाही. हे व्हिडीज् एका पाठोपाठ एक प्ले होणार आहेत. 

याचबरोबर, यूट्यूबच्या होम पेजवर युजर्स साऊंडशिवाय कॅप्शनसोबत एका पाठोपाठ एक व्हिडीओ पाहू शकतील. हे व्हिडीओज् ऑटोप्ले मोडमध्ये असल्यामुळे एक व्हिडिओ संपल्यानंतर दुसरा व्हिडीओ प्ले होणार आहे. तसेच, युजर्स या फीचरला डिसेबल किंवा ओन्ली वायफाय मोडवर ठेऊ शकतात. 

यासंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनुसार,  'Autoplay on Home Feature' येत्या आठवड्यात अॅन्ड्राईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवरील सर्व यूट्यूब अॅप युजर्संना ही सुविधा मिळणार आहे. तसेच, या फीचरचा उपयोग करणार नाहीत, अशा युजर्संना स्विच ऑफ करण्याचा सुद्धा ऑप्शन दिला आहे. हे फीचर स्विच ऑफ करण्यासाठी युजर्स  (Settings > Autoplay > Autoplay on Home > and choose from Wi-Fi only/ Off/ Always On) ही स्टेप्स फॉलो करु शकतात. 

Web Title: youtubes mobile apps will now autoplay videos on the home tab by default on ios and android

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.