YouTube अॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर, कास्ट न करताच टीव्हीवर पाहू शकता व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 02:18 PM2022-06-03T14:18:02+5:302022-06-03T14:18:26+5:30
यूट्यूबने (YouTube) एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. जे युझर्सना त्यांच्या टीव्हीला त्यांच्या iOS किंवा Android स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची परवानगी देईल.
YouTube ने टीव्हीवर व्ह्युइंग एक्सपिरिअन्स वाढवण्याच्या उद्देशानं त्यांच्या अॅपसाठी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. हे नवीन फीचर युझर्सना त्यांचे टीव्ही त्यांच्या iOS किंवा Android स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची परवानगी देईल. याच्या माध्यमातून व्हिडीओ डिव्हाइसेसमध्ये सिंक होऊ शकतील. यापूर्वी केवळ कास्ट केल्यावरच मोबाइलवरील व्हिडीओ टीव्हीवर पाहता येत होते.
म्हणून आणलं फीचर
YouTube च्या मते, ८० टक्क्यांहून अधिक लोकांनी ते टीव्ही पाहताना दुसरे डिजिटल डिव्हाइस वापरत असल्याचं सांगितलं. या कारणास्तव, कंपनीने हे फीचर युझर्ससाठी सादर केलं आहे. या फीचरमुळे युजर्सना आता व्हिडीओ कास्ट करण्याची गरज भासणार नाही.
करावं लागणार इतकंच
या फीचरचा वापर करण्यासाठी युझरचा फोन ज्या खात्यानं लिंक केलाय त्याच खात्यानं टीव्हीही लिंक असला पाहिजे याची खात्री करायला हवी. त्यानंतर स्मार्टफोनवर YouTube अॅप उघडा आणि त्यावर सूचना मिळाल्यावर ‘कनेक्ट’ क्लिक करा. एकदा दोन डिव्हाईसेस सिंक झाल्यानंतर, वापरकर्ते व्हिडीओंवर कमेंटही करू शकतात, नेक्स्ट प्लेसाठी लाइनअप, लाईक करू शकतात आणि थेट त्यांच्या फोनवरून सबस्क्रिप्शनही घेऊ शकतात. टीव्हीवर कंटेन्ट पाहण्यासाठी त्यांना सर्चबारचावापरही करता येईल. दरम्यान, आता युझर्सना कास्टिंगच्या ऑप्शनचा वापर करावा लागणार नाही.