SpO2, ब्लड प्रेशर मॉनिटर, व्हॉइस कॉलिंग्ससह आला Zebronics स्मार्टवॉच; किंमत देखील आहे कमी
By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2021 04:58 PM2021-06-16T16:58:31+5:302021-06-16T16:59:27+5:30
Zebronics Smartwatch launch: स्वदेशी कंपनी Zebronics ने Zeb-FIT4220CH नावाचा स्मार्टवॉच लाँच केला आहे.
ऑडिओ प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वदेशी कंपनी झेब्रॉनिक्सने आपला प्रॉडक्ट पोर्टफोलियो वाढवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आता देशात स्मार्टवॉच लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच Zeb-FIT4220CH मॉडेल नंबरसह बाजारात दाखल झाला आहे. या स्मार्टवॉचमध्ये SpO2 आणि ब्लड प्रेशर मॉनिटर असे फीचर्स आहेत. (Zebronics launches smartwatch Zeb-FIT4220CH)
या स्मार्टवॉचमध्ये व्हॉईस कॉलिंग फिचर देखील देण्यात आले आहे. डिवाइसमधील माईक आणि स्पीकरच्या वापर करून युजर्स फोन लावू शकतात किंवा आलेला कॉल उचलून त्यावर बोलू शकतात. तुम्ही या वॉचचा वापर करून स्मार्टफोनमधील म्युजिक आणि कॅमेरा कंट्रोल करू शकता. हा वॉच झोप, चाललेले अंतर आणि वापरलेल्या कॅलरीज देखील ट्रॅक करू शकते. हा स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि आयओएस अश्या दोन्ही स्मार्टफोन्ससोबत वापरता येतो.
Zeb-FIT4220CH मध्ये 1.2-इंचाचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे आणि यात 7 वेगवेगळे स्पोर्ट्स मोड आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेसेस आहेत. यासोबत देण्यात आलेली IP67 रेटिंगमुले हा वॉटर रेजिस्टंट बनतो.
Zebronics Zeb-FIT4220CH स्मार्टवॉचची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच अमेझॉन इंडियावर विविध रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.