भिंत, छताला बनवा पडदा, घरच्या घरी सिनेमा हॉलचा माहोल; ZEBRONICS चा स्वस्त प्रोजेक्टर आला बाजारात

By सिद्धेश जाधव | Published: April 25, 2022 05:48 PM2022-04-25T17:48:24+5:302022-04-25T17:48:47+5:30

ZEBRONICS नं आपला नवा प्रोजेक्टर भारतीय बाजारात लाँच केला आहे. जो फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Zebronics Zeb Pixa Play 12 Projector Launched In India In Budget Segment   | भिंत, छताला बनवा पडदा, घरच्या घरी सिनेमा हॉलचा माहोल; ZEBRONICS चा स्वस्त प्रोजेक्टर आला बाजारात

भिंत, छताला बनवा पडदा, घरच्या घरी सिनेमा हॉलचा माहोल; ZEBRONICS चा स्वस्त प्रोजेक्टर आला बाजारात

googlenewsNext

टीव्हीवर चित्रपट बघणं आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट हे दोन वेगवेगळे अनुभव आहेत. जी मजा मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्याची आहे ती टीव्हीच्या स्क्रीनवर मिळत नाही. थिएटरचा अनुभव तुम्ही प्रोजेक्टर्सच्या माध्यमातून घरच्या घरी मिळवू शकता. हे प्रोजेक्टर्स साधारणतः महागडे असतात, परंतु Zebronics ने एक नवा बजेट फ्रेंडली प्रोजेक्टर भारतात सादर केला आहे. ज्याची विक्री फ्लिपकार्टवरून केली जात आहे.  

ZEBRONICS Zeb-Pixa Play 12 ची किंमत 

ZEBRONICS Zeb-Pixa Play 12 प्रोजेक्टर सध्या फ्लिपकार्टवर विकला जात आहे. तिथे या डिवाइसची किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत इतर प्रोजेक्टर्सच्या तुलनेत तशी कमी आहे. याची खरेदी करताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळवू शकता. तसेच कंपनी यावर एक वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.  

ZEBRONICS Zeb-Pixa Play 12

ZEBRONICS Zeb-Pixa Play 12 प्रोजेक्टर रिमोट कंट्रोल्ल्ड आहे त्यामुळे तुम्ही दूरवरून देखील याचा वापर करू शकता. यातील बिल्ट इन स्पिकर डॉल्बी ऑडियोला सपोर्ट करतात. त्यामुळे तुम्हाला दमदार साऊंड आउटपुट मिळतो जो थिएटरचा अनुभव देतो. हा प्रोजेक्टर पडद्यापासून 5.6 फुटांवर ठेवावा लागेल. यातील लॅम्प 30000 hrs वापरता येतो. 1920 x 1080 Pixels रिजोल्यूशनचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या प्रोजेक्टरची मॅक्सिमम ब्राईटनेस 3000 lm आहे. यात 1 HDMI पोर्ट ज्याचा वापर करून तुम्ही लॅपटॉप, मोबाईल, स्मार्ट टीव्ही बॉक्स डेस्कटॉप, गेमिंग कन्सोल इत्यादी अनेक डिवाइस जोडू शकता.  

Web Title: Zebronics Zeb Pixa Play 12 Projector Launched In India In Budget Segment  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.