अर्ध्या किंमतीत बघता येणार तुमच्या आवडत्या मालिका; Zee5 Premium सब्सक्रिप्शनवर 50 टक्के सूट  

By सिद्धेश जाधव | Published: September 2, 2021 12:06 PM2021-09-02T12:06:03+5:302021-09-02T12:06:31+5:30

Zee5 Premium Subscription Price: ZEE5 तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोन्स अ‍ॅपसह वेब आणि स्मार्ट टीव्हीवरून देखील वापरू शकता.

Zee5 premium 1 year subscription at 50 percent discount offer  | अर्ध्या किंमतीत बघता येणार तुमच्या आवडत्या मालिका; Zee5 Premium सब्सक्रिप्शनवर 50 टक्के सूट  

अर्ध्या किंमतीत बघता येणार तुमच्या आवडत्या मालिका; Zee5 Premium सब्सक्रिप्शनवर 50 टक्के सूट  

googlenewsNext

Zee5 वर चला हवा येऊ द्या, मन झालं बाजिंद इत्यादी मालिका आणि मराठी चित्रपट उपल्बध आहेत. परंतु हे शोज आणि मुव्हीज कुठूनही पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. या महागड्या सब्सक्रिप्शनमुळे जर तुम्ही आतापर्यंत Zee5 premium चे सब्सक्रिप्शन घेतले नसेल. तर आता तुमच्यासाठी या ओटीटी प्लॅटफॉर्मने सुवर्णसंधी सादर केली आहे. Zee5 Offer अंतर्गत तुम्ही वार्षिक सब्सक्रिप्शनवर अर्धे पैसे वाचवू शकता.  

ZEE5 सब्सक्रिप्शनचे प्लॅन्स  

झी5 प्रीमियमच्या वार्षिक सब्सक्रिप्शनची किंमत 999 रुपये आहे, परंतु नवीन ऑफर अंतर्गत या प्लॅनवर 50 टक्क्यांची सूट मिळत आहे. तुम्ही हा प्लॅन आता फक्त 499 रुपयांमध्ये मिळवू शकता. यासाठी कोणत्याही कोडची गरज नाही. या प्लॅनमध्ये तुम्ही 2800+ चित्रपट, 150+ वेब सिरीज आणि Live TV चा आनंद घेऊ शकता तेही कोणत्याही जाहिरातीविना. 499 रुपयांमध्ये तुम्ही 3 डिव्हाइसेसवरून Zee5 अ‍ॅक्सेस करू शकता. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.  

त्याचबरोबर कंपनीने 3 महिन्यांचा प्लॅन देखील सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. या प्लॅनमधील इतर लाभ वार्षिक प्लॅन प्रमाणे आहेत. परंतु या प्लॅन अंतर्गत तुम्ही फक्त 2 डिव्हाइसेसवरून कंटेंट बघू शकता.  

ZEE5 तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोन्स अ‍ॅपसह वेब आणि स्मार्ट टीव्हीवरून देखील वापरू शकता. इथे मराठीसह 12 भाषांमधील कंटेंट उपलब्ध आहे. तुम्ही प्लॅटफॉर्मवर काही कंटेंट मोफत स्ट्रीम करू शकता. तसेच ZEE5 प्रीमियमचे सदस्यत्व कंपनीने ‘क्लब’ आणि ‘ऑल अ‍ॅक्सेस’ अश्या दोन श्रेणीत विभागले आहे. 

Web Title: Zee5 premium 1 year subscription at 50 percent discount offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.