जगातील सर्वात छोटा 3G फोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 10:50 AM2020-01-11T10:50:44+5:302020-01-11T11:04:44+5:30

जगातील सर्वात छोटा 3G फोन लाँच करण्यात आला आहे.

zini mobiles starts selling worlds smallest 3g smartphone know price and features | जगातील सर्वात छोटा 3G फोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

जगातील सर्वात छोटा 3G फोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

Next
ठळक मुद्देजिनी मोबाईल्सने सर्वात छोट्या फोनसाठी किकस्टार्टर कँपेन लाँच केलं आहे.Zanco tiny t2 असं जगातील सर्वात छोट्या 3G फोनचं नाव असून यामध्ये सर्व फंक्शन उपलब्ध आहेत. 31 ग्रॅम वजनाचा हा फोन आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. नवनवीन फीचर्स असलेले विविध कंपनीचे स्मार्टफोन्स हे सातत्याने येत असतात. जगातील सर्वात छोटा 3G फोन लाँच करण्यात आला आहे. फोन तयार करणाऱ्या जिनी मोबाईल्सने (Zini Mobiles)  सर्वात छोट्या फोनसाठी किकस्टार्टर कँपेन लाँच केलं आहे. कंपनीने कँपेन पेजवर या फोनबाबतची काही माहिती शेअर केली आहे. यामध्ये डिझाईन आणि फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. 

Zanco tiny t2 असं जगातील सर्वात छोट्या 3G फोनचं नाव असून यामध्ये सर्व फंक्शन उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जड आणि मोठ्या फोनला एक ऑप्शनच्या मदतीने हा नवा छोटा 3G फोन रिप्लेस करेल असं म्हटलं जात आहे. 31 ग्रॅम वजनाचा हा स्मार्टफोन आहे. एप्रिल 2020 पासून या डिव्हाईसची शिपिंग सुरू होणार आहे. तसेच हा छोटासा फोन मल्टिपल फंक्शनवाला असणार असल्याची माहिती पेजवर देण्यात आली आहे. या फोनमध्ये युजर्सना कॅमेरा, व्हिडीओ रिकॉर्डिंग, MP3 आणि MP4 प्लेबॅक, गेम्स, कॅलेंडर आणि एफएम रेडीओ मिळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

छोट्या 3G फोनच्या मदतीने युजर्स कॉल करू शकतात. तसेच टेक्स्ट मेसेजही पाठवू शकतात. कॅलेंडर आणि अलार्म क्लॉक मॅनेजचा ऑप्शनही यामध्ये देण्यात आला आहे. 31 ग्रॅम वजनाच्या जगातील सर्वात छोट्या फोनमध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि एसओएस मेसेज फंक्शन देण्यात आले आहे. कंपनीने फोनमध्ये 32GB पर्यंत स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे. फोन एकदा चार्ज केल्यानंतर युजर्सना सात दिवसांचा स्टँडबाय वेळ मिळणार आहे. कॅल्क्यूलेटर, फाईल मॅनेजर, टास्क मॅनेजर आणि नोटपॅड सारख्या अनेक गोष्टींचा फोनमध्ये समावेश आहे. 

'या' बातम्याही नक्की वाचा

लय भारी! युजर्सच्या प्रायव्हसीसाठी फेसबुकने आणले 'हे' 4 दमदार फीचर्स

Whatsapp वर आला 'New Year Virus'; वेळीच व्हा सावध

व्हॉट्स अ‍ॅपचे मॅसेज डिलीट झालेत? चिंता नको; ही ट्रीक वापरा आणि परत मिळवा...

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

 

Web Title: zini mobiles starts selling worlds smallest 3g smartphone know price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.