Zomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:45 AM2020-01-21T11:45:53+5:302020-01-21T11:47:02+5:30

उबर ही कंपनी अॅपबेस टॅक्सी सेवा पुरविते. या कंपनीला भारतात उबर इटद्वारे काही यश मिळत नव्हते.

Zomato purchased Uber Eat; only cab service will be run by the company | Zomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार

Zomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार

Next
ठळक मुद्देजे ग्राहक उबर इट्समध्ये आहेत त्यांना झोमॅटोवर रिडायरेक्ट केले जाणार आहे.उबरच्या कर्मचाऱ्यांवरही नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते.

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत असलेल्या झोमॅटोनेउबर या टॅक्सीसेवा पुरविणाऱ्या कंपनीचा भारतातील इबर इट या व्यवसाय विकत घेतला आहे. झोमॅटोने हा व्यवहार 2485 कोटी म्हणजेच 35 कोटी डॉलरला केला आहे. यामुळे झोमॅटो आणि उबर ट्विटरवर सकाळपासून ट्रेंड करत आहेत. 


उबर ही कंपनी अॅपबेस टॅक्सी सेवा पुरविते. या कंपनीला भारतात उबर इटद्वारे काही यश मिळत नव्हते. या कारणामुळे झोमॅटोला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. उबरकडे या कंपनीचे 9.9 टक्के समभाग राहणार आहेत. उबरने त्यांचा व्यवसाय केवळ भारतातच विकला आहे. अन्य देशांमध्ये इट्स उबरकडेच राहणार आहे. जर उबर एखाद्या बाजारपेठेमध्ये जम बसवू शकत नसेल तर ती बाजारपेठ सोडून देते. मात्र, उबर कॅब कंपनी सुरूच ठेवणार आहे. 


उबर इट्सच्या ग्राहकांचे काय? 
जे ग्राहक उबर इट्समध्ये आहेत त्यांना झोमॅटोवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. तसेच उबरच्या कर्मचाऱ्यांवरही नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. झोमॅटो उबर इट्सच्या टीमला सामावून घेणार नसल्याचे समजते. असे झाले तर उबर इट्सच्या अन्य भागात य़ा कर्मचाऱ्यांना पाठविले जाऊ शकते. 

Web Title: Zomato purchased Uber Eat; only cab service will be run by the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.