ऑगस्टपासून ‘या’ लॅपटॉपमध्ये वापरता येणार नाही Zoom अॅप; जाणून घ्या यावरील उपाय
By सिद्धेश जाधव | Published: June 20, 2022 09:12 AM2022-06-20T09:12:04+5:302022-06-20T09:12:38+5:30
व्हिडीओ कॉलसाठी Zoom अॅपचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो. परंतु आता काही लॅपटॉप्समधील सपोर्ट बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.
Zoom अॅपचा वापर लॉकडाउन काळात वाढला होता आणि अजूनही ऑफिस मिटींग्स व ऑनलाईन क्लासेससाठी याचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जात आहे. परंतु आता झूम युजर्ससाठी वाईट बातमी आली आहे. पुढील महिन्यापासून झूम अॅप काही लॅपटॉपमध्ये वापरता येणार नाही. रिपोर्टनुसार, झूम अॅप ऑगस्ट 2022 पासून Chromebook वर अधिकृतपणे सपोर्ट करणार नाही. यासाठी पर्याय देखील उपलब्ध करवून दिला जाणार आहे.
क्रोम ओएसवर चालणारे क्रोमबुक क्रोम अॅप्सला सपोर्ट करतात. परंतु फर्स्ट क्लास अनुभव देण्यासाठी गुगलनं आपलं लक्ष प्रोग्रेसिव वेब अॅप्सवर शिफ्ट केलं आहे. त्यामुळे क्रोम ओएस बेस्ड क्रोमबुकवरील क्रोम अॅप्सचा सपोर्ट काढून घेतला जात आहे. त्यामुळे नवीन अॅप्स स्वीकारले जाणार नाहीत आणि जुने अॅप्स जून 2022 पासून क्रोम वेब स्टोरवरून काढून टाकले जातील. विंडोज, मॅक आणि लिनक्सनं जून 2021 मध्ये क्रोम अॅप्सचा सपोर्ट सोडला आहे. परंतु क्रोम बुक युजर्ससाठी नवे पर्याय देखील आहेत.
नवीन पर्याय उपलब्ध
अधिकृत सपोर्ट जरी बंद करण्यात आला असला तरी काही काळ झूम अॅप वापरता येईल. परंतु क्रोमबुक युजर्स झूम वेब अॅप (Zoom web app) वर स्विच करू शकतील. जो 2021 पासून क्रोमबुकवर उपलब्ध आहे, ज्यात जास्त फीचर्स आहेत. सुरुवातीला असलेल्या त्रुटी आता भरून काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ कॉलसाठी एक चांगला पर्याय आहे.