दोन दिवसांत Zoom अॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 05:47 PM2020-05-28T17:47:57+5:302020-05-28T17:49:34+5:30
Zoom अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरात बसून ऑफिसचं काम करावं लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग घेण्यासाठी Zoom अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. Zoom अॅपवर मीटिंग करताना अनेकदा यूजर्सना समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे Zoom अॅपचं नवीन व्हर्जन लाँच करण्यात आले असून 30 मे पर्यंत अॅप अपडेट न केल्यास यूजर्सना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
Zoomने 5.0 हे अपडेट अॅप लाँच केले आहे आणि तो GMC एन्क्रिप्शन प्लॅटफॉर्मवर पूर्ण सक्षमतेनं काम करणार आहे. सुरक्षितता आणि प्रायव्हसीवरून या अॅपबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मागील महिन्यात सुधारित सिक्युरिटी फिचर्ससह नवीन अपडेट अॅप लाँच केला. त्यामुळे यूजर्सना आता तो अपडेट करावाच लागेल.
#Update to the most secure version of Zoom by May 30!
— Zoom (@zoom_us) May 28, 2020
➡️ https://t.co/64XvO6YRNspic.twitter.com/JSlk3OL5EU
कंपनीनं सांगितले की,''सर्व यूजर्सनी कृपया करून 5.0 अॅप अपडेट करून घ्या. 30 मे नंतर जुना व्हर्जनवरून Zoom मीटिंमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला अॅप अपडेट करावाच लागेल. 30 कोटी यूजर्स हा अॅप वापरतात आणि त्यामुळे त्यांना अॅप अपडेट करावाच लागेल. अपडेट अॅपमध्ये नवीन सिक्युरिटी फिचर दिले गेले आहे. त्याशिवाय पासवर्ड प्रोटेक्शन आणि अनऑथोराईज एक्सेस ओळखण्यासाठी कंट्रोल दिले गेले आहेत. नव्या अपडेटमुळे होस्ट आता मीटिंग संपवण्याशिवाय मध्येच सोडण्याचाही निर्णय घेऊ शकतो.
अॅप कसा करता येईल अपडेट, पाहा व्हिडीओ
Have you downloaded Zoom 5.0 yet? Not sure how? See these 3 easy ways to upgrade to the latest Zoom client https://t.co/wdqaLcvYvT
— Zoom (@zoom_us) April 29, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन
IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव
MS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय
आयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...
सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण
India vs Australia : कसोटीपाठोपाठ वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेच्याही तारखा ठरल्या