20GB रॅम आणि अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो ZTE Axon 30; सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 07:00 PM2021-07-05T19:00:04+5:302021-07-05T19:03:49+5:30
ZTE Axon 30 launch: ZTE Axon30 सीरीज नवीन अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्याच्या नवीन व्हर्जनसह सादर केली जाऊ शकते. हा कॅमेरा गेल्यावर्षी बाजारात आलेल्या ZTE Axon20 मधील अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा जास्त चांगला असेल.
काही दिवसांपूर्वी ZTE कंपनीच्या एका अधिकाऱ्याने कंपनी एका 20GB रॅम असलेल्या स्मार्टफोनवर काम करत असल्याचा खुलासा केला होता. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला जाईल अशी देखील माहिती समोर आली होती. कंपनीने गेल्यावर्षी असाच एक अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात आणला होता. यावर्षी ZTE अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह ZTE Axon 30 स्मार्टफोन लाँच करू शकते.
ही बातमी Sparrows News ने दिली आहे. ZTE Axon30 सीरीज नवीन अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्याच्या नवीन व्हर्जनसह सादर केली जाऊ शकते. हा कॅमेरा गेल्यावर्षी बाजारात आलेल्या ZTE Axon20 मधील अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा जास्त चांगला असेल. ZTE चा हा नवीन 5G स्मार्टफोन अलीकडेच ZTE A2322 मॉडेल नंबरसह 3C सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला होता. या ZTE स्मार्टफोनमध्ये 55W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. ZTE चा हा स्मार्टफोन Axon 30 नावाने लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
ZTE Axon 30 स्मार्टफोनबद्दल 22 जुलैला लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. तसेच या ZTE च्या फोनमध्ये 20GB रॅम दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये रॅम एक्सपँशन टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. यात प्रोसेसिंगसाठी Snapdragon 888+ चिपसेट दिला जाऊ शकतो. परंतु या फोनची सर्वात मोठी खासियत यात मिळणारा अंडर स्क्रीन कॅमेरा हीच असेल.