नव्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह 27 जुलैला येणार ZTE Axon 30; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Published: July 19, 2021 12:18 PM2021-07-19T12:18:41+5:302021-07-19T12:19:54+5:30

Zte Axon 30 launch: विबोवर शेयर करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये ZTE Axon 30 स्मार्टफोन 27 जुलैला लाँच केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Zte axon 30 smartphone with new under display camera generation to launch on july 27  | नव्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह 27 जुलैला येणार ZTE Axon 30; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

हा ZTE स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड, ब्लू, सिल्वर ग्रेडिएंट आणि व्हाइट अश्या चार रंगात सादर केला जाईल. 

Next

ZTE ने आपल्या आगामी अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन ZTE Axon 30 च्या लाँचची घोषणा केली आहे.  या फोनमध्ये सेकंड जेनरेशनचा अंडर डिस्प्ले कॅमेरा देण्यात येईल. कंपनीने याची माहिती चिनी मायक्रो ब्लॉगिंग साईट Weibo च्या  माध्यमातून दिली आहे. विबोवर शेयर करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये ZTE Axon 30 स्मार्टफोन 27 जुलैला लाँच केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच हा ZTE स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड, ब्लू, सिल्वर ग्रेडिएंट आणि व्हाइट अश्या चार रंगात सादर केला जाईल.  (ZTE Axon 30 5G launch date and full specifications revealed)

ZTE Axon 30 चे स्पेसिफिकेशन्स 

काही दिवसांपूर्वी हा नवीन ZTE Axon 30 अंडर डिस्प्ले कॅमेरा फोन सर्टीफाकेशन साईट TENAA वर लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगनुसार नवीन Axon 30 USC (अंडर-स्क्रीन कॅमेरा) स्मार्टफोनमध्ये 6.92 इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो.  

नवीन ZTE Axon 30 स्मार्टफोनमध्ये 3.2GHz च्या मॅक्सिमस स्पीडसह ऑक्टा-कोर चिपसेट दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये Snapdragon 865 चा ओव्हर क्लॉक्ड व्हर्जन म्हणजे Snapdragon 870 चिपसेटसह असण्याची शक्यता आहे. नवीन ZTE Axon 30 स्मार्टफोनमधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा एका वर्तुळाकारात आणि दुसऱ्या वर्तुळाकारात 8MP+5MP+2MP असे कॅमेरा सेन्सर दिले जाऊ शकतात.  

नवीन ZTE Axon 30 ची खासियत या फोनमधील 16MP चा सेकंड जेनरेशन अंडर डिस्प्ले कॅमेरा सेन्सर असेल. या फोनच्या पोस्टरमध्ये फिंगर प्रिंट सेन्सर दिसत नाही त्यामुळे यात अंडर डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर मिळण्याची देखील शक्यता आहे. या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट दिला जाईल. या फोनचे वजन 190 ग्राम आणि जाडी 7.8mm आहे. 27 जुलै रोजी ZTE Axon 30 चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स समोर येतील.  

Web Title: Zte axon 30 smartphone with new under display camera generation to launch on july 27 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.