भन्नाट! डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा! 100MP सेन्सर आणि पावरफुल प्रोसेसरसह ZTE Axon 40 सीरिज लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: May 10, 2022 11:33 AM2022-05-10T11:33:56+5:302022-05-10T11:56:11+5:30

ZTE Axon 40 Ultra आणि ZTE Axon 40 असे दोन भन्नाट स्मार्टफोन बाजारात आले आहेत. छुपा सेल्फी कॅमेरा आणि 100MP चा रियर कॅमेरा अशी यांची खासियत आहे.  

ZTE Axon 40 Ultra And Axon 40 Pro Launched with 100MP Camera And Under Display Selfie Camera   | भन्नाट! डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा! 100MP सेन्सर आणि पावरफुल प्रोसेसरसह ZTE Axon 40 सीरिज लाँच 

भन्नाट! डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा! 100MP सेन्सर आणि पावरफुल प्रोसेसरसह ZTE Axon 40 सीरिज लाँच 

Next

ZTE नं चीनमध्ये ZTE Axon 40 Ultra आणि Axon 40 Pro असे दोन भन्नाट स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यातील वेगवान Qualcomm Snapdragon चिपसेट फक्त खासियत नाही तर यात 5000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यातील अल्ट्रा मॉडेल अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह येतो तर प्रो मॉडेलमध्ये 100MP चा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.  

ZTE Axon 40 Ultra चे स्पेसिफिकेशन  

ZTE Axon 40 Ultra मध्ये 6.8 इंचाचा फुल HD+ कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा मुख्य सेन्सर, 64MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 64MP पेरिस्कोपिक टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. परंतु यातील 16MP चा अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा लक्ष वेधून घेतो.  

ZTE Axon 40 Ultra मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 1TB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा शानदार स्मार्टफोन Android 12 आधारित MyOS 12 वर चालतो. बॅटरी बॅकअपसाठी कंपनीनं 5,000mAh च्या बॅटरीचा वापर केला आहे.  

ZTE Axon 40 Pro चे स्पेसिफिकेशन 

ZTE Axon 40 Pro मध्ये अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा मिळत नाही. या फोनमध्ये पंच होलमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 100MP चा मुख्य सेन्सर आहे. सोबत 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि एक मॅक्रो सेन्सर मिळतो. यात 6.67 इंचाचा फुल HD+ कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.  

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं जुन्या फ्लॅगशिप लेव्हल क्वॉलकॉम Snapdragon 870 SoC चा वापर केला आहे. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 512TB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 12 आधारित MyOS 12 वर चालतो. बॅटरी बॅकअपसाठी यात 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

ZTE Axon 40 सीरिजची किंमत   

ZTE Axon 40 Ultra च्या 8GB RAM व 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 4,998 युआन (सुमारे 57,500 रुपये) आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये विकत घेता येईल. ZTE Axon 40 Pro ची किंमत 2,998 युआन (सुमारे 35,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन Crystal Mist Blue, Magic Night Black आणि Star Orange कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.   

Web Title: ZTE Axon 40 Ultra And Axon 40 Pro Launched with 100MP Camera And Under Display Selfie Camera  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.