अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टमसह स्वस्त ZTE Blade A31 सादर; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: July 14, 2021 03:28 PM2021-07-14T15:28:48+5:302021-07-14T15:30:29+5:30
ZTE Blade A31 मध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर, 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
ZTE ने बजेट कॅटेगरीमध्ये ZTE Blade A31 स्मार्टफोन रशियात लाँच केला आहे. हा फोन Android 11 (Go Edition) वर चालतो. तसेच यात Unisoc SC9863A प्रोसेसर आणि 8 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ZTE Blade A31 रशियात RUB 7,490 (अंदाजे 7,600 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत या स्मार्टफोनच्या एकमेव 2GB रॅम + 32GB स्टोरेज मॉडेलची आहे. हा भारतासह जगातील इतर बाजारपेठांमध्ये कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र मिळाली नाही.
ZTE Blade A31 चे स्पेसिफिकेशन
ZTE Blade A31 मध्ये 5.45 इंच एचडी+ आयपीएस डिस्प्लेस देण्यात आला आहे. हा फोन Unisoc SC9863A प्रोसेसरला सपोर्ट करतो. या प्रोसेसरला 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 128GB पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोन Android 11 (Go Edition) वर चालतो. यात
फोटोग्राफीसाठी ZTE Blade A31 मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पावर बॅकअपसाठी ZTE Blade A31 मध्ये बॅटरी 3,000 एमएएचची देण्यात आली आहे. ही बॅटरी इंटेलिजेंट पावर-सेविंग मोडसह येते. कनेक्टिविटीसही या फोनमध्ये मायक्रो-यूएसबी पोर्ट, एनएफसी, ड्युअल-सिम (नॅनो) स्लॉट, जीपीएस, ग्लोनास, 4जी एलटीई, ब्लूटूथ वी4.2, 2.4GHz, वाय-फाय इत्यादींचा समावेश आहे.