64MP क्वाड रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह ZTE Blade V30 लाँच; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: July 17, 2021 11:39 AM2021-07-17T11:39:51+5:302021-07-17T11:41:49+5:30
ZTE Blade V30 Launch: ZTE Blade V30 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.
अनोखे स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ZTE कंपनी ओळखली जाते. कंपनीने कोणताही गाजावाजा न करता मिड रेंज स्मार्टफोन ZTE Blade V30 मेक्सिको लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 64 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. भारतासह इतर देशांमध्ये हा फोन कधी उपलब्ध होईल याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (ZTE Blade V30 series launches with 64MP cameras and 5,000 mAh batteries)
ZTE Blade V30 चे स्पेसिफिकेशन्स
ZTE Blade V30 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Unisoc T618 प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित MiFavor UI वर चालतो. प्रोसेसरला 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. फोनमधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.
ZTE Blade V30 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ZTE Blade V30 मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
ZTE Blade V30 ची किंमत
ZTE Blade V30 स्मार्टफोन मेक्सिकोमध्ये 5,099 MXN (अंदाजे 19,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.