Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:07 PM2020-07-24T12:07:22+5:302020-07-24T12:07:36+5:30
क्रीडा विश्वानेही चीनला मोठा दणका दिला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरात अनेक स्पर्धा रद्द होण्याचं सत्र सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) घेतला. कोरोना व्हायरसमुळे चीनविरोधात जगभरात संतापाची लाट आहे. चीनच्या वुहान शहरातून हा व्हायरस जगभरात पसरला, असा दावा केला जात आहे. त्यामुळे अमेरिकेपासून भारतापर्यंत सर्वांनी चीनला खडसावले आहे. त्यात आता क्रीडा विश्वानेही चीनला मोठा दणका दिला आहे. चीनमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी घेतला गेला.
IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना
एटीपी (ATP) आणि डब्ल्यूटीए (WTA) यांनी चीनमध्ये होणाऱ्या सर्व 11 स्पर्धा रद्द केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात चीनमध्ये टेनिस स्पर्धा खेळवण्याचा धोका पत्करणार नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केलं. या स्पर्धांचे ठिकाण बदलण्याचे किंवा तारखा बदलण्याएवजी त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यावर्षी चीनमध्ये एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नसल्याचे चीननं आधीच जाहीर केलं होतं.
'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!
डब्ल्यूटीएचे चेअरमन स्टीव्ह सायमन यांनी सांगितले की,''चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धा रद्द करण्याची घोषणा करताना आम्हाला दुःख होत आहे. चीनच्या निर्णयाचा आम्ही सन्मान राखतो, परंतु लवकरच सर्व ठिक होईल अशी अपेक्षा आहे.''
All seven WTA tournaments that were scheduled in China on WTA’s 2020 provisional calendar will not be held ---> https://t.co/IJ5loZWicppic.twitter.com/pybLjofLmi
— wta (@WTA) July 24, 2020
The ATP has announced the cancellation of the 2020 China tournament swing.
— ATP Tour (@atptour) July 24, 2020
डब्लूटीएनं सात, तर एटीपीनं चार स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यात आशियातील एकमेव मास्टर्स 1000 स्पर्धेचा समावेश होता. एटीपीचे चेअरमन एंडरी यांनी सांगितले की,''चीनच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. त्यामुळे मनावर दगड ठेवून आम्हाला घोषणा करावी लागत आहे, की स्पर्धा रद्द कराव्या लागत आहेत.''